32 C
Mumbai
Friday, June 18, 2021
घर राजकारण आदित्य ठाकरे दाखवा आणि फुकट लसीकरण मिळवा

आदित्य ठाकरे दाखवा आणि फुकट लसीकरण मिळवा

Related

“आदित्य ठाकरे दाखवा आणि १८-४४ वयोगटाला लसीकरण फुकट मिळवा अशी योजनाच भाजपाने आणलीय.” अशी खोचक टीका करून सुरु होणारा एक व्हिडिओ भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट केला आहे. “हरवलेले पालकमंत्री आदित्य ठाकरे कुणाला दिसले का तौक्ते वादळानंतर ? सापडले तर सांगा आम्हालाही.” असं ट्विटही त्यांनी केलं.

अतुल भातखळकर यांनी एक विडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ठाकरे सरकारचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे दाखवा आणि १८-४४ वयोगटातल्या लोकांना लसीकरण फुकट मिळवा. अशी योजनाच मी स्वतः आणि भारतीय जनता पार्टीने आणलीय. वर्ष झालं या उपनगरातल्या पालकमंत्र्यांचं उपनगरात दर्शनच लोकांना होत नाही. निसर्ग वादळ येऊन गेलं, पर्वाचं तौक्ते चक्रीवादळ झालं. वर्सोवा, मढ, मार्वे, बोरिवली इथल्या मच्छीमारांचं नुकसान झालं. चाळीमध्ये, बिल्डींमध्ये पाणी शिरलं, फांद्या पडून लोकांच्या गाड्या तुटल्या. बिल्डिंगच्या कंपाऊंड वॉल तुटल्या. ४८ तास लोकांचे रस्ते बंद झाले. पण या उपनगराचे पालकमंत्री हे फक्त ऑनलाईन दिसतायत, प्रत्यक्ष दिसत नाहीत. माझा प्रश्नाय, आदित्य ठाकरे कुठे आहेत? त्यांनी किती कोविड सेंटरना भेटी दिल्या? त्यांनी किती कोविड हॉस्पिटलला भेटी दिल्या? हे आपले कायम घरात लपून बसल्येत. म्हणून उपनगरात आदित्य ठाकरेंना दाखवा आणि लसीकरण फुकट मिळवा. ही घोषणा आज मुंबई भारतीय जनता पार्टीने लागू केलेली आहे.”

हे ही वाचा:

तुम्ही केंद्र सरकारकडे तोंड वेंगाडण्याच्या पलिकडे काय केले?

सुशील कुमारला ६ दिवसांची पोलिस कोठडी

अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट

अभाविप कार्यकर्त्याच्या घरावर तृणमूलच्या गुंडाचा हल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा देखील भातखळकरांनी असाच समाचार घेतला होता.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा