31 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरराजकारण‘द केरळा स्टोरी’ला विरोध करणारे आयसीसचे समर्थक

‘द केरळा स्टोरी’ला विरोध करणारे आयसीसचे समर्थक

अनुराग ठाकूर यांनी दिला इशारा

Google News Follow

Related

केंद्रीय क्रीडा व माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी रविवारी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला होणाऱ्या राजकीय विरोधावर कडाडून टीका केली. ‘जे सुदीप्तो सेन यांच्या चित्रपटाच्या विरोधात बोलतात, ते दहशतवादी आणि इस्लामिक स्टेटचे समर्थक आहेत,’ असे सांगत ठाकूर यांनी देशातील हिंदू महिलांच्या धर्मांतराविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.

गेल्या आठवड्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर कथितपणे चुकीची माहिती पसरवल्याबद्दल टीका होत असून त्याचा देशाच्या काही भागांमधून निषेधही केला जात आहे. महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यासाठी सोहना येथे आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी ‘चुकीचा इतिहास’ शिकवणाऱ्या मागील सरकारांवर परखड टीका केली.

केंद्र सरकार यात सुधारणा करेल. त्यानुसार, लवकरच एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये बदल दिसून येतील,’ असे ते म्हणाले. “आमच्या तरुण पिढ्या त्यांना चुकीचा इतिहास का शिकवला गेला, याचा जाब लवकरच पूर्वीच्या सरकारांना विचारतील. ते येत्या काही काळात दिसेल. आम्हाला विरोध होत असूनही आमचे प्रयत्न सुरूच राहतील. पूर्वी परकीय आक्रमकांचा गौरव होत असे. आता भारताच्या खऱ्या वीरांच्या अमर बलिदानांना आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये योग्य स्थान मिळत आहे,” असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

संस्कृत, काश्मिरी, कोकणी भाषांमध्ये शब्दकोश प्रकाशित होणार

घरावर मिग- २१ विमान कोसळून दोघांचा मृत्यू

ऑपरेशन कावेरी म्हणजे ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाचा डंका

राहुल म्हणजे एकदिवस सद्दाम, दुसऱ्या दिवशी अमूल बेबी

कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणार्‍या कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भातील प्रश्नांना उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले. गेल्या आठवड्यात, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी या संदर्भात निःपक्षपातीपणे तपास होऊ द्यावा, असे आवाहन कुस्तीपटूंना केले होते आणि गरज पडल्यास दिल्ली पोलिस कायद्याच्या कक्षेत कठोर कारवाई करतील, अशी ग्वाहीही दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
76,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा