33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणकाँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच

काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच

Google News Follow

Related

अनेक दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राजस्थानमध्ये यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र काँग्रेस अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, या प्रक्रियेतील आजचा महत्वाचा दिवस आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. त्यामुले नेमकं कोण कोण अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या एकूण सहा नेत्यांमध्ये अध्यक्षपदाची स्पर्धा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. राजस्थानमध्ये झालेल्या राजकीय वादानंतर अशोक गेहलोत अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले. आता शशी थरूर, दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी शैलजा,मीरा कुमार आणि मुकुल वासनिक यांच्या नावाची काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चा सुरु आहे. मात्र, दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली आहे.   यासोबतच काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. मात्र , त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

या उमेदवारीमध्ये जी २३ मधील नेते शशी थरूर यांनी नुकतंच अध्यक्षपदाचा अर्ज देखील भरला आहे. तर काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि कुमारी शैलजा यांच्यामध्येही चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज हे सर्व नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज, ३० सेप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर ८ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. १७ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला अखेर काँग्रेसचे अध्यक्ष कोण याचे उत्तर मिळणार आहे.

हे ही वाचा:

गुजरातमध्ये सापडला खोट्या नोटांचा साठा

देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याआधी उधमपूर बॉम्बस्फोटाने हादरले

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे उभे राहणार होते. त्यामुळे सचिन पायलट हे मुख्यमंत्री होणार असे म्हटले जातं होते. मात्र राजस्थानमध्ये राजकीय सत्तासंघर्षाचा वाद तापला होता. काँग्रेस अध्यक्षपदही हवे आणि राजस्थानचे मुख्यमंत्रीपदही हवे, अशी इच्छा असल्याने अखेर गहलोत यांनी अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून माघार घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा