28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारणतृणमलच्या खासदाराला पुन्हा आली हुक्की; उपराष्ट्रपतींची हजारदा नक्कल करणार

तृणमलच्या खासदाराला पुन्हा आली हुक्की; उपराष्ट्रपतींची हजारदा नक्कल करणार

कल्याण बॅनर्जी यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची मिमिक्री केल्यामुळे वाद झाला असतानाच, रविवारी त्यांनी पुन्हा त्यांची नक्कल केली. तसेच, हा एक कलाप्रकार असून आपण त्यांची हजारोवेळा मिमिक्की करत राहू,’ असे सुनावले.

‘मी मिमिक्री करतच राहणार. हा एक कलाप्रकार आहे. गरज भासल्यास मी हजारोवेळा मिमिक्री करेन. माझी मते व्यक्त करण्याचा मला मूलभूत अधिकार आहे. तुम्ही मला त्यासाठी तुरुंगातही टाकू शकता. मी माघार घेणार नाही,’ असे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले. पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना, बॅनर्जी यांनी ‘क्षुल्लक मुद्द्यावरून’ नाराज झाल्याबद्दल धनकड यांना फटकारले.

हे ही वाचा:

अर्जेंटिनात इंधनदरात ६० टक्के वाढ; डायपर दुपटीने महाग

पराभवानंतर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात फिरकल्याच नाहीत

अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली

बारामतीतील प्रकल्पासाठी २५ कोटी देणाऱ्या अदानींचे पवारांकडून कौतुक

सोमवारी कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांची संसदेच्या आवारातच मिमिक्री केली होती. त्यानंतर धनकड यांनी आपण संसदेचा आणि उपराष्ट्रपतीपदाचा कोणताही अवमान सहन करणार नाही, असे निवेदन जाहीर केले होते. तसेच, त्यांनी त्यांची मिमिक्री करणारे तृणमूलचे खासदार आणि त्याचे रेकॉर्डिंग करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनाही फटकारले होते. तर, ही मिमिक्री म्हणजे तमाम शेतकरी समाजाचा अवमान असल्याचेही या निवेदनात धनकड यांनी म्हटले होते. या वक्तव्याचाही बॅनर्जी यांनी समाचार घेतला. ‘धनकड यांची जोधपूरमध्ये कोट्यवधी किमतीची मालमत्ता आहे आणि दिल्लीमध्ये आलिशान फ्लॅट आहे. ते लाखो रुपयांचा सूट परिधान करतात,’ असे बॅनर्जी यांनी म्हटले होते. तसेच, शेतकऱ्याची मुलगी असणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मल्लिकने खेळाला सोडचिठ्ठी दिली आणि पुनियाने त्याचे पद्मश्री परत केले, तेव्हा त्यांनी मौन का बाळगले, असा प्रश्नही बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

मिमिक्रीप्रकरणी ऍड. अभिषेक गौतम यांनी बॅनर्जी यांच्या विरोधात नवी दिल्लीतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे दक्षिण दिल्लीच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा