सत्तरच्या दशकांतील हिंदी चित्रपटांमध्ये घोड्यांवरून येणारे दरोडेखोर हे दृश्य अनेकदा पाहिले असेल. मात्र चोरी करण्यासाठी आताही या जुन्या क्लृप्त्या वापरण्याचा प्रयत्न दोन चोरांनी केल्याचे उघड झाले आहे. दोन चोर घोड्यावर स्वार होऊन कानपूरमधील राधा-मोहन मंदिराची देणगी पेटी चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र भुंकणाऱ्या कुत्र्यांनी त्यांचा हा कट उधळून लावला.
ही घटना २० डिसेंबर रोजी घडली. केडीए धर्मशाळाजवळील राधा-मोहन मंदिरातील देणगी पेटी उचलण्याचा हा चोरांचा कट होता. मात्र त्यांना पाहून कुत्रे भुंकू लागले. तरीही या दोघांपैकी एका चोराने ही देणगी पेटी उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उचलू शकला नाही. कुत्र्यांच्या भुंकण्याने आसपासचे लोक जागे झाले. त्यामुळे हे कुत्रे घोड्यावर स्वार होऊन माघारी फिरले. या दरोड्याच्या प्रयत्नाचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
हे ही वाचा:
तृणमलच्या खासदाराला पुन्हा आली हुक्की; उपराष्ट्रपतींची हजारदा नक्कल करणार
जयपूर; १४ वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
अर्जेंटिनात इंधनदरात ६० टक्के वाढ; डायपर दुपटीने महाग
पराभवानंतर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात फिरकल्याच नाहीत
या व्हिडीओत एक चोर घोड्याच्या पाठीवर स्वार असल्याचे दिसत असून दुसरा मंदिरात जमिनीवर चिकटवण्यात आलेली देणगी पेटी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र त्यांचा हा दरोड्याचा प्रयत्न फसला.२१ डिसेंबर रोजी मंदिराची देखभाल करणाऱ्या निखिल सोनी यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्राथमिक तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी या घोड्यावर स्वार असलेल्या चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचे बार्रा पोलिस ठाण्याचे प्रभारी दिनेश बिष्ट यांनी सांगितले.