29.5 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरराजकारणपरिवारालाच प्रदेश मानणाऱ्यांची दुर्गती होणारच!

परिवारालाच प्रदेश मानणाऱ्यांची दुर्गती होणारच!

योगींचा अखिलेश यादव यांना टोला

Google News Follow

स्वतःच्या कुटुंबालाच समाज आणि प्रदेश मानणाऱ्या नेत्यांची दुर्गती निश्चित आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. लोकप्रतिनिधींनी जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवाव्यात, मात्र काही नेते जनतेपासून दूर राहून केवळ कुटुंबातच मग्न असतात, अशी टीकाही त्यांनी केली.

वाराणसी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. नीलकंठ तिवारी यांच्या ७६ दिवसांच्या प्रभाग प्रवास अभियानाच्या समारोपप्रसंगी आणि स्वच्छता मित्र सन्मान सोहळ्यात योगी आदित्यनाथ बोलत होते. यावेळी त्यांनी परिवारवादावरून विरोधकांना लक्ष्य केले.

योगी आदित्यनाथ म्हणाले, “लोकप्रतिनिधीच दुपारी १२ वाजता झोपेतून उठत असेल, नेतृत्व करणारेही दुपारी १२ वाजता उठत असतील, स्वतःच्या कुटुंबातच मग्न राहत असतील आणि आपल्या कुटुंबालाच समाज व प्रदेश मानण्याची चूक करत असतील, तर त्यांची दुर्गती होणारच.” समाज, प्रदेश आणि देशालाच आपले कुटुंब मानणारेच परिवर्तन घडवू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकदा निवडून आल्यानंतर लखनऊमध्येच राहणाऱ्या आणि पुन्हा आपल्या मतदारसंघात न फिरकणाऱ्या लोकप्रतिनिधींवरही त्यांनी टीका केली. जनप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याबरोबरच सरकारी बांधकामांचे संरक्षण करावे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, याच कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आलेल्या प्रयागराजमधील जमिनीवर गरीब, वंचित आणि दलितांसाठी बहुमजली निवासी इमारती उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मानधनातून कपात करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हे ही वाचा:

अमली पदार्थ तस्करीतून कमावलेली १३.४३ कोटींची मालमत्ता जप्त

‘कैसा हराया’ चे वडील शिंदे सेनेत

धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ आपोआप मिळणार नाही!

आठ वर्षांपूर्वीच्या व्हिडीओवरून ध्रुव राठीला समन्स

उत्तर प्रदेश आउटसोर्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान १६ हजार रुपये मानधन देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना ईएसआयअंतर्गत वैद्यकीय उपचार, सुरक्षा विमा आणि भविष्य निर्वाह निधीचे लाभही मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी १० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा