28 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
घरक्राईमनामा‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलना टाळे’

‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलना टाळे’

Google News Follow

Related

भारताबद्दल खोटी माहिती आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर मोठी कारवाई करणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. अशा वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर बंदी घालणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने अशाच २० युट्यूब चॅनल आणि दोन वेबसाईट्सवर बंदी घातली होती. यापुढेही केंद्र सरकार अशा वेबसाईट्स आणि युट्यूबवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिला आहे.

भारताबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आल्याचे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. जगभरातील मोठ्या देशांनी याची दखल घेतली असून युट्यूबने देखील पुढाकार घेत अशा युट्यूब चॅनलला ब्लॉक केले आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

हे ही वाचा:

भारतीय संघाच्या कर्णधार, उपकर्णधारासह चार खेळाडूंना कोरोनाची लागण

कुरापती चीनने भारतीय हद्दीतून १७ वर्षीय मुलाचे केले अपहरण

कोरोना प्रतिबंधक लसी आता मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणार

मुलायम परिवारातही आता भा’जप’

डिसेंबर २०२१ मध्ये गुप्तचर संस्थांशी समन्वय करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवण्याचा ठपका ठेवत २० युट्यूब चॅनल आणि दोन वेबसाईट्सवर बंदी घातली होती. बंदी घातलेले युट्यूब चॅनल आणि वेबसाईट्स हे पाकिस्तानमधून चालवले जात होते. ते भारतासंबंधी संवेदनशील विषयांवर खोटी माहिती पसरवत होते. या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर काश्मीर, भारतीय सैन्य, राम मंदीर, जनरल बिपीन रावत, भारतातील अल्पसंख्याक समुह आदी विषयांवर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा