29.7 C
Mumbai
Wednesday, May 13, 2026
घरस्पोर्ट्सथायलंड ओपनमध्ये सिंधू-श्रीकांतची विजयी आगेकूच; आयुष शेट्टी बाहेर

थायलंड ओपनमध्ये सिंधू-श्रीकांतची विजयी आगेकूच; आयुष शेट्टी बाहेर

Google News Follow

Related

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतासाठी बुधवारचा दिवस संमिश्र ठरला. स्टार खेाडू पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांनी दमदार विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर युवा खेळाडू आयुष शेट्टीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

माजी विश्वविजेती पी. व्ही. सिंधूने चायनीज तैपेईच्या तुंग सिउ-टोंगचा अवघ्या ३३ मिनिटांत २१-९, २१-१२ असा पराभव केला. सहाव्या मानांकित सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत कोर्टवर पूर्ण नियंत्रण ठेवले. तिचा हा यंदाच्या हंगामातील सर्वात जलद विजयांपैकी एक मानला जात आहे.

आता सिंधूचा पुढील सामना डेन्मार्कच्या अमाली शुल्झविरुद्ध होणार असून दोघी प्रथमच आमनेसामने येणार आहेत.

पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांतनेही शानदार कामगिरी केली. २०२१ वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलच्या पुनरावृत्तीत त्याने सिंगापूरच्या लोह कीन यूचा २१-१४, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. २०१३ चा थायलंड ओपन विजेता असलेला श्रीकांत संपूर्ण सामन्यात आत्मविश्वासाने खेळला.

आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या सू ली यांगशी होणार आहे.

दुसरीकडे, आयुष शेट्टीने जपानच्या सहाव्या मानांकित कोडाई नाराओकाविरुद्ध जोरदार लढत दिली. पहिला गेम गमावल्यानंतर आयुषने दमदार पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला. मात्र निर्णायक गेममध्ये नाराओकाने पूर्ण वर्चस्व गाजवत २१-१३, १७-२१, २१-४ असा विजय मिळवला.

महिला एकेरीत उन्नती हुड्डाने घरच्या प्रेक्षकांची पसंती असलेल्या पोर्नपावी चोचुवोंगला ११-२१, २१-१७, २१-१६ असे हरवत मोठा धक्का दिला.

१९ वर्षीय अनमोल खरबला विद्यमान विजेती चेन यू फेईला हरवण्याची मोठी संधी होती. पहिला गेम जिंकल्यानंतर आणि निर्णायक गेममध्ये ११-२ अशी आघाडी घेतल्यानंतरही ती विजय मिळवू शकली नाही. चेन यू फेईने जोरदार पुनरागमन करत १९-२१, २१-१३, २१-१८ असा विजय मिळवला.

याशिवाय थारुन मन्नेपल्लीला जपानच्या कोकी वतनबेविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, लक्ष्य सेन, तन्वी शर्मा, देविका सिहाग, मालविका बन्सोड आणि इशाराणी बरुआ यांचे सामने बुधवारी होणार असून मिश्र दुहेरीत भारताच्या तीन जोड्याही मैदानात उतरणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा