२४ ते २७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान रांची येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई फेडरेशन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हर्ष राऊतची निवड झाली आहे. हर्ष १०० मीटर आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये भाग घेईल. वरिष्ठ गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेला तो ठाणे जिल्ह्यातील पहिला पुरुष खेळाडू आहे. हर्ष याबाबत म्हणाला, “माझ्या निवडीबद्दल मी खूप आनंदी आहे. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन.”
हे ही वाचा:
लोकपाल कार्यालयाला हव्यात प्रत्येकी ६० लाखांच्या सात बीएमडब्ल्यू
बीएआरसी शास्त्रज्ञ असल्याची बतावणी! ‘अणुबॉम्ब डिझाइन’चे नकाशे जप्त
सणासुदीतील विक्रीने रचला इतिहास
निवडणूक आयोगावर आरोप म्हणजे संविधानाचा अपमानच!
“हा आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. हर्ष हा भारताचे प्रतिनिधित्व करणारा माझा पाचवा खेळाडू आहे. गेल्या ३ महिन्यांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे हर्षची निवड झाली. मला आशा आहे की तो स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, असे हर्षचे प्रशिक्षक निलेश पाटकर म्हणाले. मीनल पलांडे आणि अशोक आहेर (योजना प्रमुख – टीएमसीपीवाय) यांनी हर्षचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.







