रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने पंजाब किंग्सविरुद्ध खेळलेल्या आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-1 सामन्यात केवळ १० ओव्हरमध्ये विजय मिळवून आयपीएल प्लेऑफ इतिहासातील सर्वात जलद धावांचा पाठलाग (Fastest Chase) करत नवा विक्रम प्रस्थापित केला.
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना केवळ १४.१ षटकात १०१ धावा केल्या. आरसीबीच्या जोश हेजलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत प्रभावी मारा केला. पंजाबकडून फक्त मार्कस स्टॉइनिस (२६), प्रभसिमरन सिंह (१८) आणि अजमतुल्ला उमरजई (१८) हेच काहीसा टिकून खेळले.
RCB कडून प्रत्युत्तरात फिलिप सॉल्टने केवळ २७ चेंडूत नाबाद ५६ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीत ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. त्याला कॅप्टन रजत पाटीदारने (१५*) साथ दिली आणि दोघांनी मिळून केवळ १० ओव्हरमध्ये सामना जिंकून विक्रमी विजय नोंदवला.
या विजयासह RCBने आयपीएल प्लेऑफ इतिहासातील सर्वात जलद १००+ धावांचा पाठलाग करत क्रिकेटप्रेमींना अचंबित केले आहे.
