28.2 C
Mumbai
Wednesday, July 8, 2026
घरस्पोर्ट्सविराटच्या प्रेमात जोकोव्हिच!

विराटच्या प्रेमात जोकोव्हिच!

भारतात येऊन क्रिकेट शिकायचंय

Google News Follow

Related

टेनिस आणि क्रिकेट या जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी दोन खेळ मानले जातात. या दोन्ही खेळांतील दिग्गजांची मैत्रीही चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि सर्बियाचा टेनिस सम्राट नोव्हाक जोकोव्हिच यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या विंबल्डन स्पर्धेत खेळत असलेल्या जोकोव्हिचने लवकरच भारतात येण्याची इच्छा व्यक्त करत विराट कोहलीसोबत क्रिकेट आणि टेनिस खेळण्याची उत्सुकता बोलून दाखवली आहे.

जिओस्टारला दिलेल्या मुलाखतीत जोकोव्हिच म्हणाला, “मला विराट कोहलीसोबत क्रिकेट आणि टेनिस खेळायला नक्कीच आवडेल. मी लवकरच भारतात येण्याचा विचार करत आहे. त्याबाबत आमच्यात चर्चा सुरू आहे. विराट हा जागतिक स्तरावरील सुपरस्टार आहे. विशेषतः भारतात त्याचे प्रचंड चाहते आहेत. त्याने माझे यजमान व्हावे, मला भारत फिरवावा आणि भारतीय संस्कृती अनुभवायला मिळावी, अशी माझी इच्छा आहे. विराट आणि भारतीय क्रिकेटबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.”

क्रिकेटबद्दल बोलताना जोकोव्हिचने आपल्या मर्यादाही प्रामाणिकपणे मान्य केल्या. तो म्हणाला, “मी सर्बियातून आलो आहे, जिथे क्रिकेट फारसा खेळला जात नाही. मात्र माझ्या टीममधील काही सदस्य ब्रिटिश असल्याने त्यांना क्रिकेटची चांगली माहिती आहे. त्यामुळे गेल्या १० ते १५ वर्षांपासून मी हा खेळ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अजूनही माझ्या क्रिकेटमधील कौशल्यात सुधारणा होण्याची गरज आहे. विराटने माझी बॅटिंगची तंत्रे आणि बॅट स्विंग सुधारण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आणि कौतुक आहे. भारतात त्याची भेट घेण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”

दरम्यान, जोकोव्हिचने विंबल्डन स्पर्धेत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. चौथ्या फेरीच्या सामन्यात त्याने रशियाच्या रोमन सफीउलिनचा ७-६ (६), ६-३, ३-६, ६-३ अशा सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या विजयासह त्याने स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या विंबल्डन पुरुष एकेरीतील १०५ विजयांच्या विक्रमालाही मागे टाकले. आता विंबल्डनच्या इतिहासात सर्वाधिक पुरुष एकेरी सामने जिंकणारा खेळाडू म्हणून जोकोव्हिचचे नाव नोंदले गेले आहे.

याशिवाय, तो सलग ९व्यांदा विंबल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला असून, या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

विंबल्डनमधील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना जोकोव्हिच म्हणाला, “विंबल्डन ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची स्पर्धा आहे. लहानपणापासून हे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न मी पाहिले होते. जगातील अव्वल खेळाडू बनण्याची आणि विंबल्डन जिंकण्याची इच्छा २०११ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर तब्बल ७ वेळा विजेतेपद मिळवणे आणि अनेक अंतिम सामने खेळणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय प्रवास राहिला आहे.”

तो पुढे म्हणाला, “या गवताच्या कोर्टवर, विशेषतः सेंटर कोर्टवर मी नेहमी माझा सर्वोत्तम खेळ करू शकलो आहे. येथील वातावरण, इतिहास आणि प्रेक्षकांकडून मिळणारी ऊर्जा मला वेगळी प्रेरणा देते. अजूनही या स्तरावर खेळत इतिहास घडवण्याची संधी मिळते, याचा मला अभिमान आहे. यंदाही आणखी काही पावले पुढे टाकून विजेतेपदासाठी लढण्याची आशा आहे.”

आता उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचचा सामना फेलिक्स ऑगर-अलियासिमे किंवा अलेजांद्रो डेविडोव्हिच फोकिना यांच्यापैकी एका खेळाडूशी होणार आहे. विंबल्डनमधील विक्रमी कामगिरी आणि विराट कोहलीबद्दल व्यक्त केलेल्या आदरामुळे जोकोव्हिच पुन्हा एकदा भारतीय क्रीडाप्रेमींच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा