28.1 C
Mumbai
Thursday, August 6, 2026
घरस्पोर्ट्सकॉमनवेल्थ गेम्सनंतर पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता

कॉमनवेल्थ गेम्सनंतर पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता

स्कॉटलंडमधील स्थानिक पोलिसांकडून बॉक्सरचा शोध सुरू

Google News Follow

Related

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ संपल्यानंतर पाकिस्तानचा बॉक्सर कुदरतुल्लाह स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन (PBF) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, स्थानिक पोलिसांनी बॉक्सरचा शोध सुरू केला आहे.

पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, कुदरतुल्लाहने कॉमनवेल्थ गेम्समधील आपली स्पर्धा पूर्ण केल्यानंतर संघाच्या हॉटेलमधून बाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा परतलाच नाही. पाकिस्तानचा संपूर्ण चमू मायदेशी परतण्याच्या सुमारे सहा तास आधी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. शेवटचे त्याला पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये पाहण्यात आले होते.

पाकिस्तानचा संपूर्ण चमू नियोजित वेळेनुसार मायदेशी रवाना झाला. मात्र कुदरतुल्लाह विमानतळावर पोहोचलाच नाही. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्याचा शोध सुरू करण्यात आला. स्कॉटलंड पोलिसांसह संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या घटनेमुळे पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनवर पुन्हा एकदा निष्काळजीपणाचे आरोप होत आहेत. यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान पाकिस्तानचे काही खेळाडू किंवा अधिकारी परदेशात बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या देखरेखीबाबत फेडरेशनच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कुदरतुल्लाहने ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्याला स्पर्धेत विशेष यश मिळाले नाही. त्यानंतर संघ मायदेशी परतण्याच्या तयारीत असतानाच तो बेपत्ता झाल्याने संपूर्ण पाकिस्तान क्रीडा प्रशासनात खळबळ उडाली आहे. कुदरतुल्लाह हा एकटाच बेपत्ता झालेला खेळाडू नाही. ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सनंतर युगांडाचे चार बॉक्सरही गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, हे खेळाडू स्कॉटलंडमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करत असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कुदरतुल्लाहच्या बाबतीत अशा कोणत्याही कारणाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

हे ही वाचा:

लाल समुद्रात भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; १३ भारतीय खलाशी सुरक्षित

निमंत्रण का नाकारतोय दिपके?

सुनेत्रा पवारांना ‘गुंगी गुडिया’ म्हटल्यावरून हर्षवर्धन सपकाळ लक्ष्य

मुंबईत नव्या सुविधांसह पुन्हा धावणार मोनोरेल

पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनने कुदरतुल्लाह बेपत्ता झाल्याच्या घटनेची दखल घेतली असली तरी त्याच्या बेपत्ता होण्यामागील कारणांबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा