31.4 C
Mumbai
Friday, June 12, 2026
घरस्पोर्ट्सठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंना राज्यस्पर्धेत ११ सुवर्ण

ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंना राज्यस्पर्धेत ११ सुवर्ण

पुण्यात झाले होते स्पर्धेचे आयोजन

Google News Follow

Related

७४ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा २०२६ ही ३१ मे ते २ जून २०२६ या कालावधीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्टेडियम, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण संस्थेच्या श्रेष्ठा शेट्टी हिने लांब उडी आणि ४ x १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. एकूण ११ सुवर्ण, १ रौप्य आणि १ ब्राँझ अशी १३ पदकांची कमाई खेळाडूंनी केली.

आकांक्षा गावडे हिने ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक, तसेच ४ x १०० मीटर रिले आणि ४ x ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अर्पिता गावडे आणि लीना धुरी यांनी ४ x ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. गिरिक बांगेरा याने ४०० मीटर आणि ४ x ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.

हे ही वाचा:

नाशिक टीसीएस प्रकरणात इस्लाम पार्टी आरोपींच्या पाठीशी

फिफा विश्वचषकात मेक्सिकोची विजयी सलामी

पुण्यातून १.३६ कोटी रुपयांची संशयित बनावट दारू जप्त

NEET च्या उमेदवारांना मिळणार अतिरिक्त १५ मिनिटे

अली शेख याने ४०० मीटर अडथळ्यांची शर्यत (हर्डल्स) मध्ये रौप्यपदक आणि ४ x ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. मानस शिंदे आणि सूरज पाटील यांनी ४ x ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या खेळाडूंना निलेश पाटकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

“सर्व खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेनुसार उत्तम कामगिरी केली. हंगामाची ही एक चांगली सुरुवात आहे. कनिष्ठ गटातील खेळाडू असूनही, श्रेष्ठा, गिरिक आणि मानस यांनी वरिष्ठ पातळीवर आपली छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. या खेळाडूंना मीनल पालांडे आणि अशोक आहेर – TMCAPY योजना प्रमुख यांचे सहकार्य लाभले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा