टेस्ला, स्पेसेक्स सारख्या जागतिक किर्तिच्या कंपन्यांचा मालक एलॉन मस्क याची विचार करण्याची पद्धत चार चौघांसारखी नाही. अन्यथा मंगळावर मनुष्य वस्ती निर्माण करण्याची स्वप्ने त्याने पाहीली नसती. या उंचीवर गेली माणसे सहसा कोणत्या गटा तटात पडलेली दिसत नाहीत. स्वत:ची प्रतिमा उदारमतवादी आहे, असे दाखवण्याचे त्यांचे पूर्ण प्रयत्न असतात. एलॉन याबाबतीत बंडखोर म्हणावा असा आहे. लंडनमध्ये १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या तथाकथित अति उजव्या गटाच्या ‘युनाईट द किंगडम’ या प्रचंड गर्दीच्या रॅलीत मस्कने भाषणच ठोकले. त्याने इशारा दिला, ‘तुम्ही हिंसाचार करा अथवा करू नका, परंतु हिंसाचार तुमच्या दिशेने येतो आहे’. मस्क यांच्या भाषणाची तुलना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्य नाथ यांच्यासोबत होऊ शकते. अमेरिकेत चार्ली कर्क या अति उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. पश्चिमेतील उदार जीवनशैली, ख्रिस्ती धर्मतत्व, स्तलांतरीतांचा विरोध, इस्लामी कट्टरतावादाला विरोध करणाऱ्या कर्क यांच्या हत्येमुळे अमेरिका हादरली, युरोपलाही हा तेवढाच हादरा होता. लोकांमध्ये प्रचंड संताप होता. त्यात लिब्रांडूंनी यात तेल ओतले. अनेकांना आनंद झाला. ऑक्सफर्ड युनियनचा अध्यक्ष जॉर्ज अब्राऊनी याने जी काही मुक्ताफळे उधळली ती पाहाता लिब्रांडू कोणत्याही देशातील असो तो देशाला कायम वाळवीसारखा पोखत असतो यावर शिक्कामोर्तब झाल. मुळात पश्चिमी देशांमध्ये जे गट देशाच्या स्वातंत्र्याबाबत, संस्कृतीबाबत बोलतात, त्यांना तिथली माध्यमे अति उजवे वगैरे का म्हणतात हे कोडे आहे. घुसखोरीला प्रोत्साहन देऊन राजकीय पोळी भाजणारे उदारमतवादी आणि देशाची संस्कृती वाचवा असे म्हणणारे अतिवादी किंवा अति उजवे म्हणणे म्हणजे, मेंदू पुरता निकामी झाल्याचे लक्षण आहे.



