29 C
Mumbai
Wednesday, August 26, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणहिंदूविरोधी इव्हेंट रोखायचे असतील तर हे करावे लागले...

हिंदूविरोधी इव्हेंट रोखायचे असतील तर हे करावे लागले…

Related

पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रो की गुंज’ हा कार्यक्रम झाला. त्यात ते मनुस्मृतीबाबत बोलले. अर्थातच वाईट बोलले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात बोलले. राहुल गांधी स्वत:ला एक निर्भीड व्यक्तिमत्वाच्या रुपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्यांचा निर्भीडपणा फक्त हिंदूंच्या विरोधात दिसतो. ते मनुस्मृतीबाबत बोलतात, कुराणात, बायबलच्या जुन्या करारात महिला अत्याचाराची खंडीभर उदाहरणे आहे, त्यावर कधी बोलणार? रा.स्व.संघाच्या विरोधात बोलतात, परंतु पीएफआय, जमात ए इस्लामी, एसडीपीआयच्या विरोधात कधी बोलणार? सोनिया गांधी यांचा परीवार हिंदू नाही. त्यांचा लढा हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटनांशी आहे. हजारो हिंदू तरुणींसमोर राहुल गांधी यांना उघडपणे हा एल्गार केला आहे. काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी इतके प्रतिभावान आहे की, पुणे म्हणजे प्रेम हे तीन शब्दांचे वाक्य सुद्धा इव्हेंट मॅनेजरने कानात म्हटल्या शिवाय त्यांना बोलता येत नाही. स्क्रीप्ट लागते, त्यांना प्रॉम्पटरही लागतो. छात्रो की गुंजचा हा महिला स्पेशल इव्हेंट होता. स्त्रीमुक्तीवर राहुल गांधी बोलत होते, मंचावर त्यांच्यासारखे बोलणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. एका हिजाबधारी तरुणी समोर एक हिंदू तरुणी सांगत होती की, आम्हाला स्कार्फ घालून बाहेर पडावे लागते. राहुल गांधी तिला विचारत होते की, हे तुला तुझ्या पालकांनी सांगितले आहे, काय? हा प्रश्न ते त्याच मंचावर उपस्थित असलेल्या हिजाबधारी तरुणीला विचारला नाही. संस्कारांचे पिंजरे तोडण्याची सूचना फक्त हिंदू तरुणींसाठी आहे. राहुल गांधींना ठाऊक आहे, हे केल्याशिवाय हिंदू समाज बरबाद होणार नाही.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा