तथाकथिक सेफॉलॉजिस्ट संजय कुमार यांनी महाराष्ट्र निवडणुकांबाबत खोटीनाटी माहीती प्रसारीत केल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. महाराष्ट्र निवडणुकांमध्ये वोट चोरी झाली, जनादेशाची चोरी झाली ही मोहीम राबवणाऱ्यांचा बोजवारा उडाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय कुमार यांची चुकीची माहिती वापरली की चुकीची माहिती आधी पेरली आणि नंतर वापरली हे उघड झाले नाही. उघड होण्याची शक्यता नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वापरण्यासाठी मुद्दे नसल्यामुळे नसलेले मुद्दे निर्माण कऱण्याचा पॅटर्न पुन्हा एकदा उघड झालेला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही केंद्र सरकारवर, देशातील घटनात्मक संस्थांवर आरोप केले. त्या आरोपांसह ते तोंडावर आपटले आहेत. आधी त्यांनी ईडी, सीबीआयला टार्गेट केले. कारण गांधी, वाड्रा यांनी केलेल्या घोटाळ्यांची चौकशी या संस्था करीत होत्या. आपला परीवार या देशातील विशेष परीवार आहे. त्यामुळे गुन्हे केले तरीही कोणीही आमची चौकशी करण्याच्या भानगडीत पडू नका, असे बहुतेक त्यांचे म्हणणे असावे. सध्या ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या विरोधात बोलतायत. वाट्टेल ते आरोप करतायत. राहुल गांधी यांनी काही आरोप केला की तो खरा आहेत की खोटा, याचा फार विचार न करता त्याची री ओढण्याचे काम त्यांच्या तैनाती फौजेतील नेते, कार्यकर्ते आणि उबाठा सारखे पक्ष करत असतात. भाजपाला निवडणुकीत पराभूत करता येत नसले तर काय किमान बदनाम तर करा, असा यांचा गेम प्लान असतो.



