28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणस्टारलिंक हे युद्धाचे हत्यार, म्हणून ते भारतात नको!

स्टारलिंक हे युद्धाचे हत्यार, म्हणून ते भारतात नको!

Related

एलॉन मस्क याने अलीकडेच भारत सरकारच्या विरोधात, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विरोधात जो बखेडा निर्माण केला, त्याचे कारण मस्कच्या मनातील सल आहे. भारतात पेटवापेटवीचे, तख्तापालटाचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात स्टारलिंकचा ना हात ना पाय. आधीच परवाना मिळाला असता तर कदाचित राहुल गांधी यांची काहीतरी मदत करता आली असती, अशी खंत त्यांच्या मनात असावी. त्यामुळेच मस्क हळहळतायत. मस्क यांच्या स्टारलिंकचे योगदान नसले तरी निवडणूक आयोगाविरोधी या आंदोलनात विदेशी हात असल्याचे आता सज्जड पुरावे समोर येत आहेत. स्टारलिंक हे अमेरिकेच्या जागतिक राजकारणाचे हत्यार बनले आहे. भारतात आज पेटवापेटवीचे जोरदार प्रयत्न होत असताना स्टारलिंकची सेवा भारतात असती तर तेच घडले असते जे इराणमध्ये घडते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झुकवण्यासाठी स्टारलिंकचा वापर झाला असता. इराणने स्टारलिंक हे अमेरिकी युद्धाचे हत्यार असल्याचा दावा उघडपणे केला आहे. स्टारलिंकची सेवा उपग्रहआधारित असल्यामुळे एखादे सरकार आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेसाठीही इंटरनेट सेवा बंद करू शकत नाही. इंटरनेटवर नेमके काय फिरते आहे, यावर सरकारला नजर ठेवता येत नाही. आपल्या डेटावर सरकारचे नियंत्रण उरत नाही. हेच टाळण्यासाठी भारताने स्टारलिंकला स्पष्ट सांगितले आहे. इथे यायचे असेल तर आमच्या नियमांचे पालन करा. इथे पायाभूत सुविधा विकसित कराव्या लागतील. म्हणजे नियंत्रण सरकारच्या हातात हवे. भारतात धंदा करायचा असेल तर उंटावरून शेळ्या हाकलेल्या चालणार नाहीत, असा स्पष्ट इशारा मोदी सरकारने दिलेला आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा