29 C
Mumbai
Saturday, August 22, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ

कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ

Related

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले, तेव्हा पाकिस्तानमधून सोशल मीडियाची ४०० हँडल्स सक्रिय होती. ‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी या हँडल्सवरून सतत काही पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात येत होते. आंदोलनात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) समर्थित दहशतवादी घुसखोरी करून घातपात करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती उघड केल्यामुळे पंजाबमधील ‘आम आदमी पार्टी’च्या सरकारने गुरुप्रीत सिंह भुल्लर यांना अमृतसरच्या पोलिस आयुक्त पदावरून काढून टाकले. आता तर ‘आयएसआय’चा हस्तक आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याने एका व्हिडिओद्वारे कॉकरोच जनता पार्टीला समर्थन जाहीर केले आहे. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, शहजाद भट्टीच्या संपर्कात असलेल्या देशातील २०० जिहादी तरुणांना स्वातंत्र्यदिनाआधी अटक करण्यात आली. शाह यांच्या वक्तव्यानंतर शहजाद भट्टीने एक व्हिडिओ जारी केला. “भारतात ज्या २०० तरुणांना अटक करण्यात आली, त्यांचा माझ्याशी काडीचाही संबंध नाही,” असे भट्टीने स्पष्ट केले. भट्टी गेली अनेक वर्षे भारतात जिहादी तरुणांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने सोशल मीडियाला हत्यार बनवले आहे. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून जिहादी साहित्य व्हायरल करायचे; ज्यामध्ये मीम्स, व्हिडिओ आणि मजकुराचा समावेश असतो. यातील काही तरुण देशात हेरगिरी व घातपातासाठी वापरले जातात. त्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च केला जातो. आखाती देशांमध्ये बसून भट्टीचे हे चाळे सुरू असतात. भारतात त्याच्या कामावर पाणी फेरण्याचे काम सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा