ऑपरेशन सिंदूरनंतर जागतिक समीकरणांमध्ये सुक्ष्म बदल दिसू लागले आहेत. काही जुन्या समीकरणांचे आशय बदलले आहेत. काही नवी समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. भारताच्या सामरीक यशाने युरोप-अमेरिकेलाही फार आनंद झालाय, अशातला भाग नाही. पाकिस्तान, चीन, बांगलादेश हा खतरनाक त्रिकोण अधिक मजबूत झालेला आहे. भारतातील पंचम स्तंभीय या त्रिकोणाचा चौथा कोन बनले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान-चीनला बऱ्याच गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. त्यांना ते शक्य झालेले नाही. ही माहिती उघड व्हावी म्हणून राहुल गांधी यांच्यासारखे नेते कामाला लागलेत की काय, असा सवाल अनेकांच्या मनात आहे.
