30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरव्हिडीओ गॅलरीटाॅप फाईव्ह सुपर हिट

टाॅप फाईव्ह सुपर हिट

Related

यशराज फिल्मच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे ‘ ने दक्षिण मध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात सलग पंचवीस वर्षे मुक्काम केला. या चित्रपटाच्या प्रदर्शनास सव्वीस वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘टाॅप फाईव्ह ‘ सुपर हिट चित्रपटावर ‘फोकस ‘ टाकताना प्रेक्षक पसंतीला विशेष प्राधान्य दिले आहे. अर्थात, ही निवड सर्वानाच मान्य होणं शक्यच नाही. आणि ते अगदी स्वाभाविक आहे. हे सर्वाधिक यशस्वी पाच चित्रपट असे बाॅम्बे टाॅकीज निर्मित आणि ग्यान मुखर्जी दिग्दर्शित ‘किस्मत ‘ ( १९४३) के. असिफ निर्मित आणि दिग्दर्शित ‘मुगल ए आझम ‘ ( १९६०) जी. पी. सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले ‘ ( १९७५) राजश्री प्राॅडक्सन्सच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित सर्वकालीन सुपर हिट ‘हम आपके है कौन ‘ ( १९९४) आणि यशराज फिल्मचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे ‘ अर्थात डीडीएलजे. एव्हाना काॅर्पोरेट युग आल्याने चित्रपटाची नावे शाॅर्ट फाॅर्ममध्ये देण्याचा ट्रेण्ड आला. सिनेमाच्या जगात यशासारखे महत्वाचे असे दुसरे काहीही नाही. पण सगळेच चित्रपट लोकप्रिय होतात असेही नाही. अगणित चित्रपटांना रसिकांनी नाकारलेही आहे. अर्थात, प्रेक्षक आपल्याला आवडलेल्या चित्रपटाला असे काही डोक्यावर घेतात की त्याच्या आठवणी, गोष्टी, किस्से, कथा, दंतकथा पुढील अनेक पिढ्यामधून येत राहतात. म्हणूनच अशा टाॅप फाईव्ह सुपर हिट चित्रपटावर हा फोकस.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा