33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरधर्म संस्कृती‘NobindiNoBusiness’ हॅशटॅगने सुतकी दिवाळी जाहिरातींना दिला दणका

‘NobindiNoBusiness’ हॅशटॅगने सुतकी दिवाळी जाहिरातींना दिला दणका

Related

नो बिंदी नो बिझनेस #NobindiNoBusiness या हॅशटॅगने गेल्या दोन-तीन दिवसांत चांगलीच धमाल उडवून दिली आहे. लेखिका शेफाली वैद्य यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर त्याचा नेमका, अचूक प्रभाव पडल्याचे दिसून आले.

शेफाली वैद्य यांनी या हॅशटॅगने आपली भूमिका मांडताना दिवाळीनिमित्त विविध कंपन्यांनी केलेल्या जाहिरातींच्या ढोंगीपणावर बोट ठेवले होते. दिवाळीच्या जाहिराती करायच्या, पण त्यात हिंदू सणांच्या प्रतिमा, प्रथा, परंपरा यांना तिलांजली द्यायची हे चालणार नाही. मी असल्या कंपन्यांची उत्पादने विकत घेणार नाही. हिंदूंचा पैसा या कंपन्यांना हवा आहे पण हिंदुंच्या परंपरांचा मान-सन्मान ते राखू इच्छित नाहीत, हे सहन केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यात त्यांनी नो बिंदी, नो बिझनेस असा हॅशटॅग वापरला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक तथाकथित स्त्रीवादी महिलांनी त्याला विरोधही केला. पण शेफाली वैद्य यांनी आपली भूमिका ठामपणे मांडून सगळ्यांची बोलती बंद केली. विशेष म्हणजे ज्या जाहिरातींविरोधात त्यांनी आवाज उठविला त्यांना आपल्या जाहिरातीत बदलही करावा लागला.

शेफाली वैद्य यांचे म्हणणे होते की, दिवाळीनिमित्त कपडे, दागिने यांच्या ज्या जाहिराती असतात त्यात मख्खपणे बसलेल्या महिला दाखविल्या जातात. शिवाय, त्या जाहिरातीत दिवाळीचा आनंद वगैरे लिहिले गेले असले तरी प्रत्यक्षात जाहिरातीतील मॉडेलच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. किंबहुना, त्यांचे चेहरे सुतकी वाटतात. दिवाळी हा हिंदूंचा सण असताना जाहिरातीत पणत्या, आकाशकंदिल, रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी असे काहीही दर्शविले जात नाही.

 

हे ही वाचा:

काकांच्या मांडीवरून भगव्याचा अपमान दिसत नसावा

धक्कादायक! अल्पवयीन मुलाने पत्नीलाच विकले

तीन किलो ड्रग्स लेहेंग्यातून चालले होते ऑस्ट्रेलियाला

बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ल्यांविरोधात ठाण्यात उठला आवाज

 

दिवाळीची जाहिरात करायची, पण त्यात दिवाळीच दाखवायची नाही, हा काय प्रकार आहे, असा सवाल शेफाली वैद्य यांनी उपस्थित केला. सणासुदीला नटलेल्या, आनंदी चेहऱ्याच्या स्त्रिया, हातात तबक, दिवे घेतलेल्या, रांगोळी काढताना स्त्रिया दाखवण्यात काय अडचण आहे? असे विचारताना त्यांनी काही जाहिरातदार कंपन्यांची उदाहरणे दिली. पु.ना. गाडगीळ या प्रसिद्ध दागिन्यांच्या कंपनीने आपल्या जाहिरातीत कपाळाला टिकली नसलेली, चेहऱ्यावर सुतकी भाव असलेली सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री दाखविल्याची टिप्पणी शेफाली वैद्य यांनी केली. हा घाव वर्मावर अचूक बसल्यामुळे कपाळावर टिकली असलेल्या सोनाली कुलकर्णीची नवी जाहिरात बाजारात आणण्यात आली. अनेकांनी या मोहिमेला पाठिंबा देत या उत्पादनांना आम्हीही विकत घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे अशा कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा