26 C
Mumbai
Saturday, August 15, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणभूतकाळ पुसण्याची गरज काय? कुछ तो है जिसकी पर्दादारी है...

भूतकाळ पुसण्याची गरज काय? कुछ तो है जिसकी पर्दादारी है…

Related

मोदी सरकारच्या अकांऊटीबिलीटीवर वारंवार प्रश्नचिन्ह लावणाऱा कॉकरोच अभिजीत दिपके स्वत:च्या भानगडी मात्र झाकताना दिसतो आहे. त्याच्या एक्स अकाऊंटमध्ये त्याने बराचसा डेटा साफ केल्याचे उघड झाले आहे. आधी आम आदमी पार्टीशी संबंध सांगणारे अकाऊंटचे नाव बदलण्यात आले, नंतर शेकडो पोस्ट डीलिट करण्यात आल्या. हे सगळे संशयास्पद आहे. ही साफसफाई करण्याचे कारण काय, असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. नवी ओळख निर्माण करून लोकांना बेवकूफ बनवण्यासाठी आधीचा इतिहास पुसून टाकणे हा यामागील इरादा असावा. दिपके या खेळातला एक मामूली मोहरा आहे. त्याचा पडद्या मागचा सूत्रधार खरा खेळ खेळतो आहे. बहोत कुछ है जिसकी पर्दादारी आहे. सोशल मीडियावर अभिजीत दिपकेचा पर्दाफाश करणाऱ्या पोस्टची सध्या लाट आहे. सोशल मीडियावर माहितीचा पूर कायम असतो. त्यात खरी किती खोटी किती, हे तपासणे महत्वाचे. सॅण्ड्रा पारकर नावाचे एक एक्स अकाऊंट आहे. त्यात ही बाई म्हणते दिपके हा पोर्नचा एडीक्ट असून त्याने एका पोर्नसाईटचे प्रिमियम सबस्क्रीप्शन घेतले आहे. या बाईने दावा केला आहे की, तिचे अकाऊंट मास रिपोर्ट कऱण्यात आले. हा दावा खरा की खोटा ते दिपकेच जाणे. या तपशीलची खातरजमा करा असे आव्हान या सॅण्ड्राबाईने दिपकेचे समर्थन करणाऱ्या अनेक इन्फ्लूएन्सरना दिले आहे. आम्ही सॅण्ड्रा यांच्या पोस्टचे ना समर्थन करत ना खंडन. काही सोशल मीडियावर देण्यात आलेले पुरावे नाकारणे दिपकेला जड जाणार आहे. अभिजीत मित्रा अय्यर, ऑफिस ऑफ विजय पटेल, स्टार बॉय तरुण, अशा अनेक सोशल मीडिया हॅण्डलनी कॉकरोच टोळीचे कपडे उतरवणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी दावा केला आहे की, दिपकेने त्याच्या एक्स अकाऊंटची साफसफाई केली आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा