31 C
Mumbai
Saturday, May 23, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणट्रम्प यांचा अजेंडा राबवण्यासाठी गोर येतायत..

ट्रम्प यांचा अजेंडा राबवण्यासाठी गोर येतायत..

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्गिओ गोर यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. सात महिन्यानंतर अमेरिकेला जाग आली. यापूर्वीचे राजदूत एरीक गारसेटी जानेवारीत मायदेशी परतल्यानंतर सात महिने ही नियुक्ती लोंबकळलेली होती. भारत आणि अमेरिकेत सध्या मोठा तणाव निर्माण झालेला असताना ट्रम्प यांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू मुत्सद्दयाची भारतात नियुक्ती केलेली आहे. ट्रुथ सोशलवर काल केलेल्या पोस्टमध्ये या नियुक्तीबाबत त्यांनी घोषणा केली. त्यांच्या पोस्टमध्ये भारताबाबत त्यांनी एकच शब्द वापरलेला आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. बाकी सगळी गोर यांचीच भलामण आहे. टेरीफ लादून भारत गुढग्यावर येईल या आशेवर ट्रम्प होते. तशी काही चिन्हे दिसत नाहीत. उलट भारत आणि चीनची जवळीक वाढताना दिसते आहे. त्यातून अमेरिकेचा गोंधळ प्रचंड वाढला आहे. नेमके करायचे काय, वागायचे कसे याबाबत हा गोंधळ आहे. हा गोंधळ किती आहे, याचे दर्शन व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नोवेरोव्ह यांनी अलिकडेच घडवले आहे. फायनान्शिअल टाईम्समध्ये लिहीलेल्या लेखात त्यांनी आधी भारताच्या विरोधात गरळ ओकली. भारताला शिकवणी देण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘आय लव्ह इंडीया’, ‘मोदी इज द ग्रेट लीडर’ अशा भलामण केली. त्यानंतर पुन्हा मळमळ बाहेर काढली. ‘गरज नसताना भारत रशियाकडून तेल विकत घेतो. क्रेमलिनसाठी मनी लाँडरींग करतो. भारत चीनच्या जवळ जातो आहे.’ अशी विधाने केली. या विधानांची चर्चा इथे अशासाठी केली जाते आहे, कारण नोव्हेरोव्ह हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू आहेत. ट्रम्प यांच्याशी जवळीक असलेले सल्लागार त्यांचा मेंदू चालवत नाहीत, ते ट्रम्प यांना हवे तेच बोलतात.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
308,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा