उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदार, खासदार फुटणार अशा बातम्या अनेक दिवस सुरू आहेत. आता ताज्या बातमीनुसार सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली उबाठाच्या खासदारांनी एकजुटीचे प्रदर्शन केले. तरीही कोण कधी कुठल्या वाटेला जाईल, याची शाश्वती कुणीही देऊ शकत नसते.



