चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काही काळापासून आजारी होते आणि त्यांना यकृताशी संबंधित आरोग्य समस्यांनी ग्रासले होते, अशी माहिती समोर आली आहे. चित्रपटसृष्टीतील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
निर्माते म्हणून त्यांनी इल्जाम, आग ही आग, शोला ऑर शबनम आणि आंखे यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. विशेषतः आंखे हा १९९० च्या दशकातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. पहलाज निहलानी यांनी अनेक कलाकारांना चित्रपटसृष्टीत पहिली संधी दिली. त्यांनी गोविंदा यांना १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या इल्जाम चित्रपटातून लॉन्च केले होते. तसेच चंकी पांडे यांनीही आग ही आग चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
गोविंदा आणि चंकी पांडे अभिनित आंखें हा १९९३ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानात हातकडी, आंधी- तुफान, पाप की दुनिया, आग का गोला, दिल तेरा दिवाना, भाई- भाई, जुली २ आणि रंगीला राजा यांसारख्या चित्रपटांचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
पुणे बनावट दारू प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर
पावसाच्या सरींसह मान्सूनचा श्रीगणेशा; केरळमध्ये आगमन
ट्रम्प यांना राजकीय धक्का; इराणविरोधी युद्ध थांबवण्याचा ठराव मंजूर
दक्षिण २४ परगणा बॉम्बस्फोट प्रकरणी तृणमूलच्या शौकत मोल्ला यांच्या निवासस्थानी छापेमारी
चित्रपट निर्माते म्हणून कार्य करण्याबरोबरच त्यांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. या काळात त्यांच्या कठोर सेन्सॉरशिप धोरणांमुळे ते अनेकदा चर्चेत राहिले होते. ते चित्रपट निर्मिती क्षेत्राशी संबंधित विविध संघटनांमध्येही सक्रिय होते आणि असोसिएशन ऑफ मोशन पिक्चर अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्सचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. २००९ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.







