29 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरविशेषदिवा-मुंब्रादरम्यान लोकलमधून महिला खाली पडली

दिवा-मुंब्रादरम्यान लोकलमधून महिला खाली पडली

लोकलमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीहून सकाळी ७ वाजून ५६ मिनिटांनी सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल दिवा-मुंब्रा दरम्यान सिग्नलमुळे थांबली होती. यावेळी लोकलमध्ये तुडुंब गर्दी होती. सीएसएमटीच्या दिशेकडील पहिल्या महिला डब्यात दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका महिलेचा गर्दीच्या दबावामुळे हात सुटला आणि ती खाली पडली. सुदैवाने लोकल जागेवरच थांबलेली असल्याने मोठी दुर्घटना टळली. महिलेला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईकरांसाठी लोकल ही जीवनवाहिनी असली, तरी गर्दीच्या वेळेत प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. सकाळच्या वेळेत महिला डब्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, दरवाजांजवळ प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांवर मोठा दबाव येतो आणि त्यातून अशा घटना घडतात. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ पर्यंत मुंबईतील सर्व लोकल मेट्रोसारख्या करण्याची घोषणा केली होती. या लोकलमध्ये स्वयंचलितपणे बंद होणारे दरवाजे, एसी सुविधा, आधुनिक सिग्नलिंग आणि अधिक सुरक्षित डबे असतील, असे त्यांनी सांगितले होते.
हे ही वाचा:
मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा ‘आहारबंदी’चा वाद

ईशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोनने १३ वर्षांने जिंकली दुलीप ट्रॉफी

विजय मल्ल्याला बनायचंय ‘कॉकरोच’!

चित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातला नेल्यामुळे राज ठाकरेंची चिडचिड

त्यामुळे मुंब्रा येथील घटना आणि मुख्यमंत्र्यांची बंद दरवाजांच्या लोकलची घोषणा यांची चर्चा आता पुन्हा होत आहे. सुरक्षित प्रवासासाठी स्वयंचलित दरवाजे हा महत्त्वाचा उपाय असला, तरी तो प्रत्यक्षात येईपर्यंत सध्याच्या लोकलमधील गर्दीचे काय, हा प्रश्न कायम आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीही प्रत्येक लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असावेत, असा निर्णय झाल्याचे सांगितले असून, नव्या लोकलच्या निर्मितीचे नियोजन सुरू आहे. मात्र नव्या सुरक्षित लोकल सेवांचा विस्तार होईपर्यंत गर्दीच्या वेळेत अतिरिक्त फेऱ्या, प्रवाशांचे योग्य नियोजन आणि दरवाजांवरील गर्दी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा