31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषबांधवगड राष्ट्रीय उद्यानात एका मागोमाग एक १० हत्तींचा मृत्यू!

बांधवगड राष्ट्रीय उद्यानात एका मागोमाग एक १० हत्तींचा मृत्यू!

तपास यंत्रणांनी तळ ठोकला

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील १० हत्तींचा मृत्यू झाला आहे. उद्यानातील एका मागोमाग एक १० हत्तींचा मृत्यू झाल्याने राज्यासह केंद्रापर्यंत खळबळ उडाली आहे. आठवड्याच्या सुरवातीला मंगळवारी चार, बुधवारी सकाळी तीन आणि रात्री एक, त्यानंतर गुरुवारी सकाळी एक आणि रात्री एक असे एकूण १० हत्ती दगावले आहेत.

प्राथमिक तपासात हत्तींच्या मृत्यूचे कारण विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विष कोणी, कसे आणि का दिले? याचा तपास सुरु आहे. हत्तींच्या मृत्यूच्या तपासासाठी केंद्र आणि राज्य वन्यजीव एजन्सीचे पथकही उद्यानात दाखल झाले आहेत. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी हत्तींच्या मृतदेहांची तपासणी करण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

मुस्लिम पुरुषाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू महिलेशी केले लग्न

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ, फोर्स वनच्या १२ जवानांची अतिरिक्त टीम तैनात!

पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन

दीपोत्सवाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाने ईदसाठीच्या हिरव्या कंदिलाला विरोध केला असता का?

बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पीके वर्मा सांगतात, “तज्ञांशी बोलणे सुरू आहे. हत्तींनी कोडो (बाजरी ) खाल्ल्याचा संशय आहे. कोडो काही वेळा हत्तींसाठी विषासारखे काम करू शकते, याचा तपास सुरु आहे. हत्तींचा मृत्यू कसा झाला हे लवकरच कळेल.

त्याचबरोबर हत्तींच्या मृत्यूनंतर केंद्रापासून राज्यापर्यंतची टीम बांधवगडमध्ये तळ ठोकून वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहेत. घटनास्थळाच्या ५ किलोमीटर परिसरात तपास सुरू आहे. हत्ती ज्या ठिकाणी पाणी पितात त्या जागेची जागेची तपासणी सुरु आहे, बाजरीच्या पिकांचीनी तपासणी सुरु आहे. विशेष म्हणजे, वनविभागाच्या म्हणण्यानुसार, खिटौली आणि पतौर रेंजमध्ये १३ हत्तींचा कळप होता, त्यापैकी १० हत्तींचा मृत्यू झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा