27 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरविशेषविसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी

विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी

गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी घटना पनवेलमध्ये काल घडली.

Related

राज्यात शुक्रवार, ९ सप्टेंबर रोजी भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला. दरम्यान, गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी घटना पनवेलमध्ये काल घडली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान ११ भाविकांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली असून सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पनवेल मधील वडघर गावात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यात ११ जणांना विजेचा जोरदार धक्का लागला. जखमींमध्ये काही लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे.

विसर्जन घाटाजवळ भाविकांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आला होता. परंतु, काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली. ही वायर मानस कुंभार या तरुणाच्या अंगावर पडल्याने त्याला विजेचा शॉक लागला. हे पाहून त्याचे कुटुंबीय वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही विजेचा शॉक बसला. या दुर्घटनेत पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील एकाच कुटुंबातील १० जणांना विजेचा शॉक बसला आहे.

सुरक्षा यंत्रणा आणि पालिका प्रशासनाची माणसे घटनास्थळी आल्यामुळे जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

७० वर्षांच्या काळात १८ भारतीय पंतप्रधानांना भेटल्या राणी एलिझाबेथ

जखमींची नावे

हर्षद पनवेलकर (वय ३२), रुपाली पनवेलकर (वय ३५), रितेश पनवेलकर (वय ३८), सर्वेम पनवेलकर (वय १५), दिलीप पनवेलकर (वय ६५), निहाल चोणकर (वय ५), दिपाली पनवेलकर (वय २४), मानस कुंभार (वय १७), वेदांत कुंभार (वय १८),  दर्शना शिवशिवकर (वय ३६), तनिष्का पनवेलकर (वय ९ महिने)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,941अनुयायीअनुकरण करा
40,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा