29 C
Mumbai
Tuesday, October 3, 2023
घरक्राईमनामायाकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Google News Follow

Related

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळी त्यांनी याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील बडा कब्रस्तान येथे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा फोटो वायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रसारमाध्यामांसमोर या प्रकरणी अधिकचे बोलणे मुख्यमंत्री शिंदे यांनी टाळले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे काही चुकीचे आहे त्यावर कारवाई होईल, एवढचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, गुरूवारी याकुब मेमनच्या कबरीला लायटिंग आणि संगमरवरी फरशी बसवल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सर्व स्तरांवरून प्रश्न उपस्थित होताच आणि टीका होताच या कबरीवरील एलईडी लाईट्स मुंबई पोलिसांनी काढून टाकल्या आहेत.

हे ही वाचा:

७० वर्षांच्या काळात १८ भारतीय पंतप्रधानांना भेटल्या राणी एलिझाबेथ

अबब!! एलिझाबेथ यांची इतकी संपत्ती मिळणार वारसांना

याकुबच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाला वक्फ बोर्डाचा पाठिंबा?

गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप

कब्रस्तानमधील दफन केलेल्या मृतदेहाची जागा ही अठरा महिन्यांनंतर खोदण्यात येते. मात्र, आता पाच वर्षे झाल्यानंतरही याकुब मेमनची कबर का खोदली गेली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच याकुबच्या कबरीवर इतका खर्च कोण करत आहे? हा सवाल देखील आता उपस्थित झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा