28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरधर्म संस्कृतीगणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप

गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप

मुंबई, पुण्यासह राज्यत दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

Google News Follow

Related

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…

गणपती निघाले गावाला…चैन पडेना आम्हाला

निरोप देतो देवा आता आज्ञा असावी, अशा घोषणांच्या गजरात मुंबई, पुण्यासह राज्यत दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईतील लालबाग, परळचा भाग गुलालाने अगदी न्हाऊन निघाला आहे. दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले आहेत.

मुंबईतील नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची आरती आता संपन्न झाली असून, विसर्जनासाठी लालबागचा राजा मार्गस्थ झाला आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक ही पहाटेपर्यंत सुरु असते. त्यानंतर बाप्पाचं विसर्जन होते. मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा मान हा मिरवणूक सोहळ्यात प्रथम असतो. मुंबईचा राजा निघाला की, इतर बाप्पा मार्गस्थ होतात. त्यामुळे मुंबईच्या राजाची आरती संपन्न झाली आणि हजारो भाविकांच्या, ढोल ताशांच्या गजरात बाप्पा मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. या पाठोपाठच प्रसिद्ध तेजुकाय गणपतीची मिरवणूक सुरु झाली आहे. पुढे चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणेश बाप्पाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात सुरु होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या काळात अनेक बाप्पांचे दर्शन घेतले. आजच्या विसर्जनाच्या दिवशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळीतील पोलीस वसाहतीतील बापाचं दर्शन घेण्यासाठी पोहचले होते. तसेच ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यातील बाप्पाचाही आज विसर्जन सोहळा आहे. या पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मनसोक्त नाचत बाप्पाचे विसर्जन केले.

मुंबईसह पुण्यातील मिरवणुकीचा थाटाचं वेगळा असतो. पुण्यातील विसर्जन सोहळ्याला अनेक नेते मंडळी सहभागी झाले आहेत. पुण्यामध्ये प्रथम मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन केले जाते. कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानला जातो. कसबा गणपतीची मिरवणूक सकाळीच सुरु झाली असून, आता त्या बाप्पाचे विसर्जन होईल. कसबा गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर चार मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतील. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची मिरवणूक संध्याकाळी निघणार आहे.

हे ही वाचा:

डायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय

पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण

अमरावतीमधील ‘ती’ मुलगी जबाबात म्हणाली…

याकुब मेमनची कबर का बनते आहे मजार?

मुंबई पुण्यासह नागपूर, औरगांबाद, कोल्हापूर, सातारा, नाशिक, रायगडमध्ये मोठ्या उत्सहात गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पांसाठी जंगी मिरवणुका निघाल्या आहेत. वाजतगाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर, महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शहर आणि उपनगरांतील चौपाट्या, तलाव, नैसर्गिक जलस्रोतांच्या ठिकाणी महापालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा