31 C
Mumbai
Monday, October 3, 2022
घरविशेषडायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय

डायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आणखी एक नवा विक्रम आपल्या नावे करत इतिहास रचला आहे.

Related

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आणखी एक नवा विक्रम आपल्या नावे करत इतिहास रचला आहे. डायमंड लीगच्या पुरुष गटातील अंतिम फेरीत २४ वर्षीय नीरजने विजय मिळवला आहे. याचबरोबर डायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये पार पडलेल्या डायमंड लीगमधील खेळाच्या पहिल्या फेरीत याकूब वाडलेजने ८४.१५ मीटर भालाफेक करत नीरजला मागे टाकले होते. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नान नीरजने ८८.४४ मीटर भालाफेक करत स्पर्धेत पुनरागमन केले. तिसऱ्या फेरीत ८८ मीटर, चौथ्या फेरीत ८६. ११ मीटर, पाचव्या फेरीत ८७ मीटर आणि सहाव्या अंतिम फेरीत नीरजने ८३.६० मीटर अंतरावर भालाफेक करत विजय निश्चित केला.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण

अमरावतीमधील ‘ती’ मुलगी जबाबात म्हणाली…

याकुब मेमनची कबर का बनते आहे मजार?

पहिल्यांदाच ठाकरेंविरोधात कुणी ‘मैदाना’त उतरलंय!

नीरजने २०२१ साली पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. त्याआधी २०१८ मधील आशिया स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०२२ जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरजने रौप्य पदक मिळवले होते. त्यानंतर दुखापतीमुळे नीरज राष्ट्रकुल स्पर्धेसाठी मुकला होता. त्यानंतर मात्र, त्याने पुनरागमन करत डायमंड लीगमध्ये बाजी मारली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा