30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषजळगाव, राजस्थानच्या ६ जणांसह तेरा जण मृतांमध्ये

जळगाव, राजस्थानच्या ६ जणांसह तेरा जण मृतांमध्ये

Google News Follow

Related

इंदूर-अंमळनेर बस दुर्घटना

आज, १८ जुलैला सकाळी इंदूरहून अंमळनेरला जाणा-या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आठ पुरुष, चार स्त्रिया तसेच एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.

एसटी महामंडळाकडून मृतांची माहिती मिळाली आहे. त्या माहितीनुसार, राम गोपाल जांगिड (जयपूर राजस्थान), जगन्नाथ हेमराज जोशी वय ७०(उदयपूर राजस्थान), निबाजी आनंदा पाटील वय (६०) यांच्या पत्नी कमला वय ५५ (जळगाव), बस वाहक प्रकाश श्रवण चौधरी वय ४० ( जळगाव ), बस चालक चंद्रकांत एकनाथ पाटील वय ४५ (जळगाव ) या मृतांची ओळख आधारकार्ड वरून करण्यात आली आहे. तसेच मुर्तजा बोरा वय २७ ( अकोला ) आणि सैफुद्दीन (इंदूर) यांची महाराष्ट्रातील नातेवाईकांनी ओळख पटवली आहे. याशिवाय अद्याप तीन मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अंमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ ही आज दि.१८ जुलै,२०२२ रोजी सकाळी साडे सात वाजता इंदूर येथून अंमळनेर कडे मार्गस्थ झाली. आज सकाळी सुमारे १० ते १०.१५ च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस नर्मदा नदीत कोसळली.

हे ही वाचा:

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

ठाकरेंना आणखी एक धक्का; भावना गवळी शिंदेंबरोबरच्या खासदारांच्या प्रतोद?

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे. घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असून बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी ०९५५५८९९०९१,जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष ०२५७२२२३१८०, ०२५७२२१७१९३ हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिध्द केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा