27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरराजकारण...म्हणून काँग्रेसच्या आमदाराने भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना केले मतदान!

…म्हणून काँग्रेसच्या आमदाराने भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना केले मतदान!

Related

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना देशभरातील राजकीय पक्षांकडून उघड पाठिंबा मिळत आहे. त्याचे प्रत्यंतर दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रपती पदाच्या मतदानात दिसून येत आहे.जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची घटनात्मक प्रमुख आदिवासी महिला असावी, या विचाराने अनेक राजकीय पक्ष आपल्या राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन त्यांना मतदान करत आहेत. ओदिशाचे कॉंग्रेस आमदार मोहम्मद मोकीम हे त्या पैकीच एक.मी माझ्या हृदयाचे ऐकले आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मला माझ्या मातीसाठी काहीतरी करायचे आहे आणि म्हणून मी द्रौपदी मुर्मू यंना मतदान केले असल्याचे कॉंग्रेस आमदार मोकीम यांनी ट्विटरवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

मी काँग्रेसचा आमदार आहे, पण मी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले असल्याचे मोकीम यांनी म्हटले आहे. एनडीएच्या बाजुने मतदान केल्याची ओडिशातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे पहायला मिळत आहे देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी मी माझ्या मातीतील महिलेची निवड केली आहे, असे कटक (बाराबती) येथील आमदार मोकीम यांनी मतदानानंतर लगेचच आपले मत व्यक्त केले. ओदिशा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सरत पट्टनायक यांची नियुक्ती झाल्यामुळे नाराज झालेले आमदार मोकीम हे स्वत: या पदासाठी इच्छुक होते. त्यामुळे आमदार मोहम्मद मोकीम यांनी २ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या सचिवपदाचा राजीनामा दिला होता.

आदिवासी महिलेला राष्ट्रपती म्हणून पाहणे अभिमानाचे असेल

वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी यांनी आधीच पाठिंबा जाहीर केला होता, तर तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनीही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या घोषणेपासून मुर्मूने ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल केली आहे. टीडीपी नेत्यांचा असा विश्वास आहे की आम्ही द्रौपदी मुर्मू जी यांना केवळ आदिवासी महिला असल्यामुळेच पाठिंबा दिला आहे आणि पहिल्या आदिवासी महिलेला राष्ट्रपती म्हणून पाहणे अभिमानाचे असेल.

हे ही वाचा:

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

सर्वच पक्षांचा वाढता पाठिंबा

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना भाजप व्यतिरिक्त, बीजेडी, वायएसआर काँग्रेस, टीडीपी, जनता दल सेक्युलर, शिरोमणी अकाली दल, जेडीयू, एआयएडीएमके, लोक जनशक्ती पार्टी, अपना दल सोनेलाल, निषाद पार्टी, बसपा, आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, एनपीपी, एनपीएफ, एमएनएफ, एनडीपीपी, एसकेएम, एजीपी, पीएमके, एआयएनआर कॉंग्रेस, जननायक जनता पार्टी यांच्यासह अनेक घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा