29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषडीजेच्या तालावर नाचता नाचता तो झाला गतप्राण

डीजेच्या तालावर नाचता नाचता तो झाला गतप्राण

व्हिडिओतील मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची चर्चा

Google News Follow

Related

डीजेच्या तालावर नाचताना अचानक एक मुलगा खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सध्या समाजमाध्यमांवर त्याच्या या कोसळून मृत्यू झालेल्या व्हिडिओची प्रचंड चर्चा होत आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातल्या शिवणी गावात काल  २५ फेब्रुवारीला ही घटना घडली आहे. विश्वनाथ जाणगेवाड हा १८ वर्षीय युवक काल लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर नाचत होता. नाचता नाचता तो खाली कोसळला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. अशी चर्चा होत आहे. त्यामुळे शिवणी गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसल्याचे कळत आहे.

हृदयविकार असलेल्या लोकांना डॉल्बी डीजेचा आवाज हा धोकादायक असतो. हे आत्तापर्यंतच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. पण अवघ्या १८ वर्षांच्या विश्वनाथला हृदयाचा आजार असण्याची शक्यता नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एका क्षणांत होत्याचे नव्हते झाले. म्हणून गावत सगळेजण हळहळ व्यक्त करत आहेत. विश्वनाथ हा जेव्हा कोसळून खाली पडला त्यावेळेस तो बराच वेळ खाली पडला होता. लोकांना वाटले त्याच्या नाचण्याचा तो एक भाग आहे पण बराच वेळ तो न उठल्यामुळे त्याला उठवले असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

दरम्यान, सध्याच्या धकाधकीच्या जीवनातं वेळीअवेळी खाणेपिणे, बदलती जीवनशैली, यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे.  पर्यायाने हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण पण वाढले आहे पण गेल्या काही वर्षात, हि तरुण मुले खेळताना, व्यायाम करताना हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. खाण्यापिण्याच्या अनेक चुकीच्या सवयीमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये गाठी तयार होतात आणि हृदयाला याचा त्रास होतो. परिणामी याकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यू येऊ शकतो. दिवसेंदिवस बैठी जीवनशैली, धूम्रपान, आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा