26 C
Mumbai
Friday, September 29, 2023
घरविशेषएका वर्षात ‘आपला दवाखाना’त २० लाख लोकांनी घेतला लाभ

एका वर्षात ‘आपला दवाखाना’त २० लाख लोकांनी घेतला लाभ

रुग्णांना वैद्यकीय सल्ला, उपचार आणि सुमारे १४० विविध चाचण्या मोफत दिल्या जातात

Google News Follow

Related

ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबईच्या महापालिकेच्या ‘आपला दवाखाना’ उपक्रमाचे उद्‌घाटन झाले होते. तिथपासून ते या शनिवारपर्यंत म्हणजेच १४ सप्टेंबरपर्यंत सुमारे २० लाख नागरिकांनी या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

या ‘आपला दवाखान्या’चे मूळ नाव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजेच एचबीटी दवाखाने असे आहे. शहरातील गरीब नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी दिल्लीत सुरू झालेल्या मोहल्ला क्लिनिकच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. ‘आपला दवाखाना’ दररोज दुपारी तीन ते रात्री १० पर्यंत चालू असतात. या वेळेमुळे नागरिकांना नोकरीवरून, कामावरून घरी परतल्यावरही डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेता येतात. यातून रुग्णांना वैद्यकीय सल्ला, उपचार आणि सुमारे १४० विविध चाचण्या मोफत दिल्या जातात. ‘या एचबीटी दवाखान्यात सुमारे २० लाख रुग्णांनी भेट दिली असली तरी पालिका रुग्णालयाच्या विभागांमधील ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये घट झालेली नाही. याचाच अर्थ एचबीटीमध्ये आलेले हे रुग्ण आधी खासगी डॉक्टरांकडे जाऊन तिथे पैसे खर्च करत असत किंवा वैद्यकीय उपचार घेतच नसत,’ असे निरीक्षण अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी नोंदवले आहे.

मुंबई महापालिकेतर्फे ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि औषधालये चालवली जातात. मात्र सन २०२२मध्ये संध्याकाळीही दवाखाने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, २ ऑक्टोबर २०२२ रोजी पहिल्या एचबीटी दवाखान्याचे उद्‌घाटन झाले. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १० असे दवाखाने असावे, अशी कल्पना होती. त्यानंतर प्रत्येक पाच ते सहा दवाखान्यांमागे एका विशेषज्ञास पॉलिक्लिनिक उपस्थित असेल, असेही बघितले गेले.

सध्या शहरात १६० दवाखाने आणि २७ पॉलिक्लिनिक आहेत. महापालिकेचे अनेक डॉक्टर त्यांची दिवसाची ड्युटी संपल्यानंतर या दवाखान्यात जातात. तर, एचबीटी दवाखाने चालवण्यासाठी अनेक डॉक्टरांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आले आहे. ‘आपला दवाखान्यात दररोज सुमारे १६ हजार रुग्ण येतात. दर महिन्याला या दवाखान्यात दोन लाख ७० हजार रुग्ण येतात,’ अशी माहिती एका डॉक्टरने दिली. तर, महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत दर महिन्याला सुमारे तीन लाख रुग्ण येतात.

हे ही वाचा :

नितीन देसाई यांच्या पत्नीचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय

उद्धवजी दंगली कोण घडवतायत ते जरा बघा

यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात पालिकेने नव्या ‘आपला दवाखान्या’साठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे या दवाखान्यांची संख्या १०६वरून २२पर्यंत पोहोचले. ही संख्या २५० ते २६०पर्यंत पोहोचवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा