28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरविशेषउत्तरकाशीत बस दरीत कोसळून २५ भाविकांचा मृत्यू

उत्तरकाशीत बस दरीत कोसळून २५ भाविकांचा मृत्यू

Related

चारधाम यात्रेतील यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस रविवार, ५ जून रोजी संध्याकाळी दरीत कोसळून अपघात झाला. उत्तरकाशीजवळ झालेल्या या अपघातात २५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बस ३० प्रवाशांना घेऊन यमुनोत्रीला जात होती, अशी माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरून ही बस यमुनोत्रीकडे जात होती. उत्तराखंड राज्याच्या हद्दीत दामता येथे ही बस दरीत कोसळली. अपघात झालेले ठिकाण हे उत्तर काशी ते देहरादून यांच्या दरम्यान आहे. या बसमध्ये ३० जण होते. तर अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत झालेले भाविक हे मध्य प्रदेशचे होते. या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच ते रात्री उत्तराखंडला रवाना झाले आहेत. मंत्री ब्रजेंद्र प्रताप सिंह आणि चार वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत उत्तराखंडला गेले आहेत.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना ५० हजार देण्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

रशिया- युक्रेन युद्धाच्या १०० दिवसांचा आढावा

मध्य प्रदेशच्या सुजालपूरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार, मुलीचा झाला मृत्यू

‘राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार जिंकणारच’

पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे लक्ष्य मुदतीआधीच गाठले

उत्तराखंडच्या सरकारनेही शोक व्यक्त करत नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तसेच जखमींच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा