31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरविशेषदिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!

दिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!

लग्न सोहळ्याला हजेरी लावून परतत असताना झाला अपघात

Google News Follow

Related

दिल्लीतील बदरपूर उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री ट्रक आणि अल्टो कारमध्ये भीषण अपघात झाला.या अपघातात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत.पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून मृतांचे मृतदेह पोस्टमॉरटमसाठी पाठवण्यात आले आहेत.अपघातात मृत्यू झालेले तिघेही एकाच वसाहतीतील रहिवासी असून फरिदाबाद येथे एका लग्न सोहळ्याला हजेरी लावून परतत असताना हा अपघात झाला.अपघात झाला तेव्हा कारमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते.अपघातात जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १२.४८ वाजता बदरपूर पोलीस स्टेशनला कॉल आला, ज्यामध्ये कॉलरने माहिती दिली की, होंडा शोरूमजवळील बदरपूर उड्डाणपुलावर कार आणि ट्रकची धडक झाली आहे. फरिदाबाद येथे एका लग्न सोहळ्याला हजेरी लावून परतत असताना हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून UP८५B २७३३४ हा अपघात झालेल्या कारचा क्रमांक आहे.

हे ही वाचा:

‘एमएस धोनीसारखे कोणीच होऊ शकत नाही’

हिमाचल प्रदेशमधील कोंडी कायम!

भाजपची केरळवर नजर; मंत्र्यांसह उतरवले प्रसिद्ध चेहरे!

आण्विक शस्त्रांचं साहित्य पाकमध्ये नेणाऱ्या चीनी जहाजाला मुंबईत रोखलं

या कारमध्ये एकूण सात जण प्रवासी होते. बदरपूर उड्डाणपुलावर कारचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने जात असलेल्या NL०१ AD८८९८ या क्रमांकाच्या ट्रकला धडकली.जखमींना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

राज (२१), संजू (३८) आणि दिनेश (२२) अशी मृतांची नावे आहेत.अपघातात जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान, पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा