31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरक्राईमनामातीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो अशीही धमकी दिली होती

Google News Follow

Related

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आणि तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो असं म्हणणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या तरुणाचे नाव किंचक नवले (वय- ३४ वर्षे) असे असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सातारा येथून किंचक याला अटक केली आहे. त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धमकी देणारी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हायरल व्हिडीओ क्लिपमध्ये “देवेंद्र फडणवीसला आम्ही महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू. आमच्यावर काय गुन्हे नोंदवायचे ते नोंदवा. हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार,” असे म्हटले गेले होते. ही टीका किंचक नवले याने केली होती. प्रक्षोभक भाषेत वक्तव्य करतानाचा किंचक नवलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच प्रकरणात किंचक नवलेला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

टेक कंपन्यांना ‘एआय’ प्रोडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

आण्विक शस्त्रांचं साहित्य पाकमध्ये नेणाऱ्या चीनी जहाजाला मुंबईत रोखलं

… अन् मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

‘सीमा मर्यादा कराराचे चीनने पालन करणे आवश्यक’

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किंचक नवलेचा शोध घेण्यात येत होता. तो वेशांतर करुन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याची माहिती समोर आली होती. अखेर सातारामधून त्याला अटक करण्यात आली. याआधी हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या योगेश सावंत यालाही अटक करण्यात आली होती. योगेश सावंत हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले होते. शिवाय आमदार रोहित पवारांनी तसे मान्यही केले होते. त्यालाही ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा