31 C
Mumbai
Monday, May 13, 2024
घरविशेषइस्रायल-हमास युद्धाला ३० दिवस पूर्ण!

इस्रायल-हमास युद्धाला ३० दिवस पूर्ण!

१४०० ज्यूंच्या मृत्यूचा इस्रायलकडून शोक

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला मंगळवारी ३० दिवस पूर्ण झाले. या निमित्त संपूर्ण इस्रायलने हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या १४०० ज्यू नागरिकांप्रति शोक व्यक्त केला. या युद्धात आतापर्यंत ११ हजारांहून अधिक जण मारले गेले आहेत. इस्रायलचे सैनिक हमासच्या सैनिकांशी आता जमिनीवरील लढाई लढत असल्याची माहिती इस्रायल सुरक्षा दलाकडून देण्यात आली.

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारले होते. मंगळवारी या हल्ल्याला ३० दिवस पूर्ण झाले. अजूनही युद्ध सुरूच आहे. लेबेनॉन आणि गाझा सीमेजवळील ज्यू नागरिकांना युद्धामुळे आपले घर सोडावे लागत आहे. गाझामध्ये जमिनीवरील लढाई सुरू असल्याचे इस्रायलचे प्रवक्ते रिअर ऍडमिरल डॅनिअल हगारी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!

जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या लश्करच्या कमांडरचा शिरच्छेद!

हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २५ हजार ४०८ नागरिक जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये किती हमासचे सैनिक होते आणि किती सर्वसामान्य नागरिक, हे कळू शकलेले नाही. मात्र पॅलिस्टिनी नागरिकांसाठी पुन्हा एकदा राफा सीमा उघडण्यात आली आहे.

रशियाने दिलेल्या माहितीनुसार, रशियामध्ये एकूण ९६ पॅलिस्टिनी नागरिकांवर उपचार सुरू आहेत.
जेरूसलेममधील अल-अक्सा मशिद इस्रायलकडून अपवित्र झाल्याचा आरोप करून हमासने हा हल्ला केला आहे. इस्रायली पोलिसांनी एप्रिल२०२३मध्ये अल अक्सा मशिद परिसरात ग्रेनेडहल्ला करून या मशिदीला अपवित्र केले होते, असा हमासचा दावा आहे. इस्रायलचे सैन्य सातत्याने हमासच्या तळांवर हल्ला करत आहे आणि अतिक्रमण करत आहे. इस्रायलचे सैन्य महिलांवरही हल्ला करत आहे, असा दावा हमासतर्फे करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा