31 C
Mumbai
Monday, October 3, 2022
घरविशेषभारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचसाठी ५ लाख तिकिटांची विक्री

भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचसाठी ५ लाख तिकिटांची विक्री

भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्डकप टी-२० सामना पाहण्यासाठी ५ लाख तिकीटांची विक्री

Related

भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर २३ रोजी होणाऱ्या वर्ल्डकप टी-२० सामन्यात आमनेसामने येतील. हा हाय व्होल्टेज सामना ऑस्ट्रेलियातील सामना मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे एक महिना अगोदरच तिकिटे विकली गेली असल्याचे आयसीसी क्रिकेट संघाने जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे पाच लाख तिकिटे विकली गेली असून अतिरिक्त स्टँडिंग रूमची सुद्धा तिकिटे काही तासात विकली गेली असल्याचे आयसीसीने जाहीर केले.

आयसीसीने सांगितल्या प्रमाणे ८२ देशातील चाहत्यानी टी-२० क्रिकेट वर्ल्डकपचा आनंद घेण्यातही तिकिटे खरेदी केली आहेत. तसेच या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. याचप्रमाणे आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की पुरुषांच्या टी-२० वर्ल्डकप सामन्यासाठी सर्वच वयोगटातील चाहत्यांचे स्वागत करण्यासाठी आयसीसी सज्ज झाली आहे. अजून वर्ल्डकप मॅचसाठी १ महिना शिल्लक असताना जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री केली आहे.

हे ही वाचा:

चीनमधली ६५६ फूट उंचीची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी

बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोघांना गमवावे लागले हात

आज शेअर बाजारावर पडझडीचे सावट

जितेंद्र आव्हाड यांना ‘शासन’; म्हाडासंदर्भातील सर्व निर्णय रद्द

२०२० मध्ये झालेल्या महिला वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेमध्ये स्टेडियमचा पूर्ण क्षमतेने वापर होणार आहे. तसेच एमसीजीवर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी जवळपास ८६ हजार १७४ प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. स्टँडिंग रूमची तिकिटे देखील काही मिनिटात फुल्ल झाली आहेत. सामन्याच्या काही दिवस आधी तिकिटांची पुनर्विक्री सुरू करण्यात येणार आहे. तिथे न येऊ शकणाऱ्या चाहते आपली तिकिटे विकू शकतात. त्यामुळे तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा