29 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरविशेषबसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोघांना गमवावे लागले हात

बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोघांना गमवावे लागले हात

Related

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला  चालणाऱ्या दोन तरुणांचे हात कापल्याची घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आगाराची बस रस्त्यावरून जात होती आणि बस चालकाच्या केबिनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आला होता. यावेळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. विकास गजानन पांडे आणि परमेश्वर पाटील अशी या तरुणांची नावे आहेत. हे दोघे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होते त्यामुळे सकाळी रस्त्यावर हे दोघे व्यायाम करत होते. हा अपघात इतका भीषण होता की, पत्र्याच्या धक्क्याने त्या दोघांचे हात तुटले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

हे ही वाचा:

आज शेअर बाजारावर पडझडीचे सावट

जितेंद्र आव्हाड यांना ‘शासन’; म्हाडासंदर्भातील सर्व निर्णय रद्द

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार

मुंबईत सकाळपासून दमदार, जोरदार

त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने बुलढाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणांना धक्का देणाऱ्या बसच्या चालकावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा