29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषएसटी अपघातातील गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजारांची मदत

एसटी अपघातातील गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजारांची मदत

Google News Follow

Related

सोलापूर- गाणगापूर बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर आज, २४ जुलै रोजी सकाळी अपघात झाला. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास या बसचा अपघात झाला असून जवळपास ७० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३५ प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

माहितीनुसार, सोलापूर- गाणगापूर बस पुलावरून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. प्राथमिक माहितीनुसार, चार ते पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा