27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरविशेषअक्षय कुमार सर्वाधिक कर भरणारा अभिनेता

अक्षय कुमार सर्वाधिक कर भरणारा अभिनेता

Related

अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एका वर्षात चार ते पाच चित्रपट करतो. अक्षयच्या एका चित्रपटाचे प्रमोशन संपत नाही तोच तो पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत असतो. याचदरम्यान, अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे. यामुळे आयकर विभागाने त्याचा गौरव केला आहे.

अक्षय कुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. गेल्या पाच वर्षांपासून अक्षय कुमार सातत्याने भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्यांपैकी एक आहे. आयकर विभागाने अक्षय कुमारला मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. पण अक्षयच्या टीमने त्याच्या वतीने हा पुरस्कार घेतला आहे.

हे ही वाचा:

एसटी अपघातातील गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजारांची मदत

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी

दरम्यान, अक्षय सध्या जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकसाठी इंग्लंडमध्ये शूटिंग करत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तो भारतात परत येऊ शकतो. त्यानंतर तो आगामी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय अक्षयच्या खात्यात ‘सेल्फी’, ‘राम सेतू’, ‘ओह माय गॉड 2’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे चित्रपट आहेत.अक्षय सुरियाच्या ‘सूरराई पोतरु’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा