30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषरुग्णालयांमधील आगींच्या घटनेत दीड वर्षात गेले ५१ बळी

रुग्णालयांमधील आगींच्या घटनेत दीड वर्षात गेले ५१ बळी

Google News Follow

Related

गेल्या १४ ते १५ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगीत जवळपास ५१ जणांनी आपला प्राण गमावला आहे. यापैकी अनेक आगीच्या घटना या कोविड रुग्णालयात घडलेल्या आहेत. या घटनांमुळे खासगी आणि शासकीय दोन्ही पातळीवरील सुविधा असे अपघात रोखण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

कोविड वॉर्डात आणि अतिदक्षता विभागात अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर होत असल्याने आगीच्या घटना घडू शकतात, असा इशारा अग्निशमन दलातील तज्ज्ञांनी दिला होता. पाईपलाईन किंवा सिलिंडरमध्ये किरकोळ गळती असली तरी रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो. मात्र, अग्निशमन यंत्रणेचा अभाव, रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटचा अभाव यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागल्याचे दिसून आले.

हे ही वाचा:

एनसीबीने गोठवली १२ कोटींची मालमत्ता

सव्वा लाख कोटींची ‘दिवाळी’

पंजाबमध्ये आता पेट्रोल ९५ तर डिझेल ८३ रु. महाराष्ट्र वाट पाहतोय!

ड्रग्स प्रकरणात होणार अस्लम शेख यांची चौकशी?

आगींच्या सत्राची सुरुवात ही वर्षाच्या सुरुवातीला लागलेल्या भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आगीपासून झाली होती. यामध्ये जवळपास ११ बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयांमध्येही अनेक आगींच्या घटना घडल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथे कोविड रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात आग लागली. यामध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णालयात अग्निशमन उपकरणे कमी होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

आग लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्त्वाचे आहे. एक सक्षम अग्निशमन यंत्रणा असायला हवी जेणेकरून आगीच्या घटनेपासून वेळीच सावध केल्यास रुग्णांचा जीव वाचू शकतो, असे माजी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रताप खरगोपीकर ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाले.

कोरोनाच्या काळात गरजेनुसार अनेक रुग्णालये उभारण्यात आली. मात्र, त्यामध्ये अग्निशमनसंबंधी सुविधांचा विचारच केला गेला नाही. तसेच नॅशनल बिल्डींग कोडच्या गाईडलाईननुसार या इमारती उभारण्यात आल्या नाहीत, असे मुंबईतील अग्नीशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा