33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषवृद्धाच्या मृत्यूप्रकरणी एअर इंडियाला ३० लाखांचा दंड!

वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी एअर इंडियाला ३० लाखांचा दंड!

डीजीसीएची कारवाई

Google News Follow

Related

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने एका ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर कडक कारवाई करत ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मूळचे भारतीय वंशाचे असलेले हे वृद्ध दाम्पत्य १५ फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कहून मुंबईला आले होते.बाबू पटेल (८०) आणि त्यांची पत्नी नर्मदाबेन पटेल (७६) हे जोडपे एअर इंडियाच्या एआय-११६ विमानातून विमानतळावर उतरल्यानंतर व्हीलचेअरची मागणी केली.परंतु, विमानतळावर प्रचंड मागणीमुळे त्यांना फक्त एक व्हिलचेअर देण्यात आली.मिळालेल्या व्हीलचेअरवर बाबू पटेल यांनी आपल्या पत्नीस बसवून स्वतः चालत येण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

अखेर शाहजहां शेख सहा वर्षांसाठी झाला निलंबित

धरमशाला कसोटीत केएल राहुल बाहेर; बुमराहचे पुनरागमन

“सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरांचे संजय राऊत गॉडफादर”

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सहा आमदार अपात्र!

त्यानंतर मुंबई विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेच्या वेळी बाबू पटेल हे अचानक खाली कोसळले.त्यानंतर त्यांना एअर इंडिया कंपनीकडून तातडीने नानावटी रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. व्हीलचेअर सहाय्य ही पूर्णपणे विमान कंपनीने दिलेली सेवा आहे, असे मुंबई विमान संचालक एमआयएएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.नागारीविमान चालन आवश्यकतांच्या तरतुदींचे पालन न करणे आणी विमान नियम, १९३७ चे उल्लंघन केल्याचा हवाला देत डिसीजीएने एअर इंडियाला नोटीस बजावली.या नोटिसीला उत्तर देण्यासाठी एअर इंडियाला सात दिवसांची मुदत देण्यात आली होती.यानंतर डिसीजीएने कारवाई करत एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा