26 C
Mumbai
Thursday, July 25, 2024
घरविशेष६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या!

६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या!

जळगावातल्या जामनेरमधील घटना

Google News Follow

Related

जळगावच्या जामनेरमधील एका ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सुभाष भिल असे आरोपीचे नाव आहे. परंतु , संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत दगडफेक केली आणि आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले असून उपचाराकरिता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहेत.

गुरुवारी(२० जून) रात्री १०.३० च्या सुमारास ही दगडफेकीची घटना घडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराचे नळकांडे फोडावे लागले. परंतु जमाव नियंत्रित होत नसल्याने अखेर पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले तर जाळपोळीच्याही घटना घडल्या.

हे ही वाचा:

ग्राहकाने ऑर्डर केलेल्या डोसाच्या सांभरमध्ये आढळले ‘मृत उंदीर’

वटपौर्णिमेमुळे मोठा अनर्थ टळला; सोलापुरमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट

‘एआय’च्या माध्यमातून पोलीस दल अधिक प्रभावशाली, कार्यक्षम होणार!

भारत खेळणार बांग्लादेश, न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका

यासंदर्भात माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते म्हणाले की, आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीला आपल्याकडे देण्याची मागणी केली. जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. परंतु, जमावाने कोणाचेही न ऐकता पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली, वाहनांची तोडफोड केली. यामध्ये ७ ते ८ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आता सध्या परिस्थिती शांततापूर्ण आहे. मात्र, हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. सीसीटीव्हीच्या आधारे तपासणी करून हल्ल्यात सामील असणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, ११ जून रोजी एक ६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची मिसिंग तक्रार आमच्याकडे आली होती. यानंतर पोलीस आणि गावकऱ्यांनी मिळून गावातील संपूर्ण परिसरात शोध घेतला असता त्याच रात्री १० च्या सुमारास मुलीचा मृतदेह सापडला. यानंतर तपासात दिसून आले की, त्याच गावातील एका व्यक्तीने मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. आरोपीच्या शोधासाठी पाच वेगवेगळ्या ती तयार करण्यात आल्या आणि काल भुसावळ मधून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा