27 C
Mumbai
Monday, June 16, 2025
घरविशेषग्राहकाने ऑर्डर केलेल्या डोसाच्या सांभरमध्ये आढळले 'मृत उंदीर'

ग्राहकाने ऑर्डर केलेल्या डोसाच्या सांभरमध्ये आढळले ‘मृत उंदीर’

अहमदाबादमधील घटना, रेस्टॉरंट सील

Google News Follow

Related

अहमदाबादच्या एका रेस्टॉरंटमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्राहकाने ऑर्डर केलेल्या डोसाच्या सांभरमध्ये मृत उंदीर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पालिकेने कारवाई करत रेस्टॉरंट सील केले आहे.

अहमदाबादचा रहिवासी असलेल्या अविनाशने आपल्या पत्नीसह २० जून रोजी शहरातील निकोल भागात असलेल्या देवी डोसा पॅलेसला भेट दिली होती. यावेळी त्याने रेस्टोरंटमध्ये डोसाची ऑर्डर दिली. त्याची ऑर्डर येण्यापूर्वी त्यांना सांभर आणि चटणी देण्यात आली. सांभार घेत असताना अविनाशला त्यात एक “मेलेला उंदीर” आढळून आले. सांभरमध्ये मृत उंदीर आढळल्याने त्याला एकच धक्का बसला.

हे ही वाचा:

मुकेश अंबानींचा डीप फेक व्हिडीओ वापरून डॉक्टरची फसवणूक

भारत खेळणार बांग्लादेश, न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका

सुपर ८ ची विजयी सुरुवात; भारताचा अफगाणिस्तानवर विजय

दक्षिण मुंबईमधून दोन बांगलादेशी महिलांना अटक

 

अविनाशने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब सावध केले आणि अहमदाबादमधील पालिका अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेस्टोरंटची तपासणी केली आणि रेस्टोरंट त्वरित सील करून टाकले. अहमदाबाद महानगरपालिकेने सील करताना नोटीसमध्ये नमूद केले आहे की, स्वयंपाकघर उघड्यावर असल्याने प्राणी किंवा किडे अन्नात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेस्टोरंट सील करण्यात येत आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हॉटेल बंद राहील, असे अधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतेच मंबईमधील एका व्यक्तीला आईस्क्रीममध्ये माणसाच्या बोटाचा तुकडा सापडला होता. तसेच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या जोडप्याला जेवणामध्ये झुरळ सापडला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा