32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषप्रवाशांच्या नाराजीनंतर नवे मार्ग शोधण्याचाच 'बेस्ट' पर्याय

प्रवाशांच्या नाराजीनंतर नवे मार्ग शोधण्याचाच ‘बेस्ट’ पर्याय

Google News Follow

Related

बेस्ट उपक्रमाने सप्टेंबर महिन्यापासून आपले अनेक बस मार्ग बंद केले आहेत, तर काही मार्गांचा विस्तार अथवा विलिनीकरण केले आहे. मात्र, हे बदल करताना प्रवाशांची गरज किंवा सोय लक्षात न घेतल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. त्यावरून प्रवाशांनी नाराजी दर्शवली आहे. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत आणि बेस्टच्या समिती सदस्यांनी स्थगिती प्रस्ताव मांडल्यावर उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले की, प्रवाशांची ही गंभीर समस्या आहे आणि ती दुर्लक्षित करता येणार नाही.

एका महिन्याच्या आत सर्व सुधारित आणि रद्द केलेल्या मार्गांसाठी एक आढावा बैठक घेण्यात येईल आणि आवश्यक असल्यास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मार्गांमध्ये बदल केले जातील. सध्या बेस्ट बसमधून दररोज २५ लाख लोक प्रवास करत आहेत. काही मार्ग रद्द केल्यामुळे इतर मार्गांवर प्रवासी संख्या वाढून त्या मार्गावर ताण पडतो. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता बसमध्ये गर्दी करणे चुकीचे आहे. तसेच बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास बंदी असतानाही अनेक बसेसमध्ये या नियमाचे पालन केले जात नाही.

हे ही वाचा:

ही आहे ठाकरे सरकारची ‘ऐतिहासिक’ कामगिरी

‘दादा’ लवकरच रुपेरी पडद्यावर

खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी

बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम

सुरक्षित अंतराच्या नियमामुळे अनेक प्रवासी रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करू लागले आहेत. नवीन बस मार्गांविषयी अजून नीट माहिती प्रवाशांना नाही. आमचे नेहमीचे मार्ग रद्द झाल्यामुळे त्याच्या पर्यायी मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नसल्याचे प्रवासी अंकुश नलावडे यांनी सांगितले. बस मार्गात बदल करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेताना प्रवाशांना विश्वासात घेण महत्त्वाचे आहे, असे वाहतूक तज्ज्ञ प्रणव नाईक यांनी ‘टाइम्स’ला सांगितले.

मार्गांवरील बसची संख्या वाढवता यावी यासाठी हे बदल करण्यात आले. पूर्वी एका बस स्थानकावर दोन वेगवेगळ्या मार्गाच्या बस येत होत्या, तर त्यातील एक रद्द केल्यामुळे त्या एका मार्गावर जास्त बस कमी वेळेच्या अंतराने धावू शकतील, असे महाव्यवस्थापक चंद्रा म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा