38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरविशेष७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलकडून खास डूडल

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलकडून खास डूडल

भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असताना या खास दिवशी गुगलनेही अनोख्या पद्धतीने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Google News Follow

Related

भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या खास दिवशी गुगलनेही अनोख्या पद्धतीने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने खास असे डूडल बनवले आहे. या डूडलमध्ये लहान मुलं पतंग उडवत असतानाचं चित्र दाखवण्यात आलं आहे.

डूडलमध्ये उगवणारा सूर्य, पहाटे सूर्याच्या नवीन किरणांमध्ये हिरवाईत पतंग बनवणारी एक स्त्री आणि तिच्याभोवती पतंग उडवणारी काही मुलं दिसत आहेत. केरळची कलाकार नीती हिने हे डूडल तयार केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतानाचं हे चित्र आहे. या डूडलमध्ये पतंगांच्या माध्यमातून भारताच्या संस्कृतीचे चित्रण करण्यात आले आहे. हे गुगल डूडल भारताच्या महान उंचीचे प्रतीक आहे.

हे ही वाचा:

बोलण्यातून, वागण्यातून महिलांचा अपमान करू नका

गांधीजी, डॉ. आंबेडकर, सावरकर, सुभाषबाबूंचा त्याग विसरता येणार नाही

गुलामीचा अंश मिटवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले पाच संकल्प

विनायक मेटे अपघात प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला अटक

“भारतात पतंग उडवणे ही एक जुनी परंपरा आहे. ही परंपरा देखील भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक ब्रिटीश राजवटीविरुद्ध घोषणा लिहिण्यासाठी पतंगाचा वापर करत असत. निषेधाचे चिन्ह म्हणून ते आकाशात उडवले जात असत,” असे डूडल बनवणारी नीती म्हणाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा