28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषक्रिकेटमुळे 'विमान' हवेत!

क्रिकेटमुळे ‘विमान’ हवेत!

Google News Follow

Related

कोरोनामुळे सर्व क्षेत्रांची आर्थिकगती मंदावली आहे. त्याला हवाई वाहतूक क्षेत्र ही अपवाद नाही. पण मुंबई विमानतळाला मात्र क्रिकेटचा हंगाम चांगलाच पावला आहे.

आयपीएल आणि टी-२० विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी जाणाऱ्या तब्बल एक लाख दहा हजार क्रिकेटप्रेमींनी विमानाने प्रवास केला आहे. तर त्यांच्या सेवेसाठी ६५५ विमाने तैनात करण्यात आली होती.
आयपीएलकाळात मुंबईहून ३१ हजार ७७९ प्रवाशांना घेऊन १७७ विमाने दुबईला रवाना झाली होती. परतीच्या प्रवासात १७३ विमानांद्वारे २४ हजार ५१६ सोळा जण मुंबई विमानतळावर दाखल झाले.

कोरोनाच्या संकटातून सावरत यंदा दुबईमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रिकेट सामने पार पडले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी उत्साहाने सामने बघायला हजेरी लावली होती. या दोन्ही स्पर्धेसाठी भारतातून सर्वाधिक प्रेक्षक गेले होते. त्यात मुंबईकरांची संख्या एक लाख दहा हजार वीस एवढी होती.

१९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात आयपीएलचा काळ चालू असताना, मुंबई विमानतळ प्रशासनाने ३५० विमानांचे नियोजन केले होते. त्यामाध्यमातून ५६ हजार ३०० क्रिकेटप्रेमी दुबईला दाखल झाले.
तर त्यानुसार २३ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीही ५३ हजार ७२० प्रेक्षक दुबईला दाखल झाले होते. त्यांच्या सेवेसाठी ३०५ विमाने तैनात होती.

हे ही वाचा:

लवकरच स्वदेशी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान

‘ओबीसी आरक्षणाचा अध्यदेश गृहीत धरता येणार नाही’! ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

आंग सान स्यू की यांना चार वर्षांचा तुरुंगवास

उद्योग जगतातील आसामी रतन टाटांना ‘आसाम वैभव’

 

आयपीएल काळात एमिरेट्स विमानाने २२ हजार २९८, फ्लाय दुबईतून १० हजार ४६२ तर इंडिगोमधून ८ हजार ८६६ प्रवाशांनी सफर केली तर टी-२० विश्वचषकासाठी एमिरेट्सने २० हजार ५०८, फ्लायदुबईने १० हजार ९३८ तर एअर इंडियाने ८ हजार ५६४ प्रवाशांनी प्रवास केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा